महानगरपालिकेचा गलथान कारभारावर रयत विद्यार्थी परिषदेचा जोरदार प्रहार…..

135

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतून वाहणार्या मुळा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली असताना ती काढण्या साठी अनेक कोटींची तरतूद असताना ती जलपर्णी काढण्याबाबत अनेकदा पत्र व्यवहार करून निवेदन देऊन सुद्धा अधिकारी अनिल रॉय पर्यावरण विभाग अभियंता संजय कुलकर्णी हे दोन्ही अधिकारी जवाबदारी ढकलण्याचा काम करतात त्यात भरीस भर म्हणून की काय अनिल रॉय हे ठेकेदार साई प्राइड यांना नेहमी पाठीशी घालण्याचा काम करत आहेत.
खूपदा पाठ पुरवठा करूनही महानगरपालिकेला जाग न आल्या मुळे रयत विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः नदीत उतरून ती जलपर्णी काढण्याचा निर्णय घेतला आणि त्या नुसार पाऊल उचलून ती जलपर्णी काढण्यास सुरुवात केली ही जलपर्णी उद्या गुढीपाडव्यानिमित्त पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि पर्यावरणमंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांना सप्रेम भेट म्हणून देण्यात येईल हेही जाहीर केले.

याबाबतीत रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणाले की आम्ही काही फार मोठं काम करत नाही पण या कामात खारीचा वाटा नक्कीच उचलू तसेच लोकांच्या आरोग्याचं काय लोकांच्या आरोग्याच्या नावाखाली जो पैसा महानगरपालिका लागते त्या पैशांचा हिशोब काय असाही प्रश्न त्यांनी विचारला .

यावेळी रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, रविराज काळे, अक्षय कोथिंबीरे, ओमकार भोईर, ऋषिकेश कानवटे, योगेश गायकवाड, विशाल नागटिळक, अक्षय माहुलकर, अजय चव्हाण, दिव्या जोशी, मनोज शर्मा, मनोज गुरव, बालाजी काकडे इ पदाधिकारी उपस्थित होते.