लोकोपयोगी सुकन्या फॉउंडेशनच्या कार्यालयाचे लोकार्पण.

65

 

सदाशिव माकडे (८१७५२२८०२०)

गडचिरोली :
येथील सुकन्या फॉउंडेशन या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासिंच्या विकासासाठी स्थापित संस्थेच्या कार्यालयाचे लोकार्पण आज दि. १२ एप्रिल रोजी करण्यात आले.
कार्यालयाच्या उदघाट्न समारंभास संस्थापक अध्यक्ष सुभाष हूलके यांचे आई – वडील श्री. विलास हूलके व सौ. शालूताई हूलके उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष हूलके यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचालन लोमेश ठाकरे यांनी केले. तर आभारप्रदर्शन पवन भरडकर यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी उपाध्यक्ष श्री. प्रल्हाद पुराम, सचिव किरण हूलके, सहसचिव मिथुन हूलके, आकाश वाटगुरे, स्वाती पुराम, माधवी शर्मा, रागिणी खुरसे व कांचन कुमरे उपस्थित होते.