एल.एंड.टी.सीमेंट कामगार संघा कडून दहा लाख निधी दिल :पूर्व सांसद.नरेश पुगलिया जिल्हाधिकारी सहायता निधि कोविन्ड-१९ रेमेडीस इंजेक्शन उपलब्ध करूँ घेण्यासाठी निधि दिली

164

प्रतिनिधी// शंकर महाकाली

चंद्रपूर: एल. एंड. टी. सीमेंट कामगार संघाकडून दहा लाख खासदार नरेश पुगलीया यांच्या निर्देशानुसार एल. अॅन्ड. टी. कामगार संघ, आवारपूर (अल्ट्राट्रेक सिमेंट) यांनी म जिल्हाधिकारी सहायता निधी कोव्हिड-१९ मध्ये रू. १०,००,००० /- (अक्षरी – दहा लक्ष रूपये) चा धनादेश मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना आज दिनांक १२.०४.२०२१ रोजी देण्यात आला.यावेळी जिल्हा काँग्रेस कमेटीचे माजी महासचिव अॅड. अविनाश ठावरी, एल. अॅन्ड. टी. कामगार संघाचे कार्याध्यक्ष शिवचंद काळे, महामंत्री साईनाथ बुचे, नगरसेवक अशोक नागापुरे हजर होते. सदर रक्कमेचा उपयोग कोरोनाग्रस्तांकरीता रेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून आर्थिक दृष्टीकोनातून कमजोर लोकांकरीता व्यवस्था करावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे, जेणेकरून या भयानक कोरोनाच्या महामारीत रूग्णांना उपयोग होईल.