गोरगरीब शेतकऱ्यांना धान रोवणी करिता दिना धरणातील पाणी सोडणार ! सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध !.. आ. डॉ देवराव होळी

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

चामोर्शी येथील दिना विश्राम गृह येथे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील दिना धरणाचे पाणी सोडण्या करिता आयोजित करण्यात आलेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत तहसिलदार गंगथले, कार्यकारी अभियंता मेश्राम, तालुका अभियंता घोलपे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, त्रियुगी महाराज दुबे, युवा नेते रितेश सावकार पालारपवार व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना आमदार डॉ होळी कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी दिना धरणातील शिल्लक पाणीसाठा व त्याचा सदुपयोग संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे त्यामुळे येथील शेतकरी चिंतातूर झाले तालुक्यातील धान रोवणी पूर्णपणे खोळंबली आहेत , याबाबत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आमदार डॉ देवराव होळी यांना निवेदन दिले की तत्काळ धान रोवणी करिता दिना धरणातील पाणी सोडण्यात यावे ! या निवेदनाची दखल घेत आज दिना धरणातील पाणी सोडन्या करिता आमदार डॉ होळी यांनी पुढाकार घेऊन आज कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत ठराव घेतला व येत्या शनिवारी दोन तारखेला तत्काळ धरणाचे पाणी धान रोवणी करिता सोडण्याचे नियोजन करण्यात आले. धरणाचे पाणी सोडल्यानंतर टेलवरील शेतकऱ्यांना पाणी पोहचण्याकरिता तालुक्यातील सर्व उपस्थित अभियंता यांच्या समक्ष नियोजन करण्यात आले.

यावेळी तालुक्यातील भाजप पदाधिकारी तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे, राजू भाऊ चुधरी, युवा नेते आशिष भाऊ पिपरे, प्रतीक राठी, विलास सावकार चरडूके व कार्यकर्ते तसेच अनेक गोरगरीब शेतकरी व शेतमजूर नागरिक उपस्थित होते.