माहूर तालूक्यातील मच्छिंद्र पार्डी येथे कोरोना लसीकरण मोहिमेला सूरवात.

49

 

 

माहूर प्रतिनिधी // पवन कोंडे

 

कोरोना महामारी या प्राणघातक रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला असुन दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची म्रुत्यूची आकडेवारी चिंता वाढविणारी आहे.शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या परंतू दिवसेंदिवस कोरोणा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे, कोरोनापासून नागरीकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी सर्वत्र मोफत लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून दि. 10एप्रील 2021रोजी सकाळी 9 वाजता तालूक्यातील मच्छिंद्र पार्डी येथील जिल्हा परिषद शाळेत गट विकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांच्या हस्ते लसीकरणास सुरवात करण्यात आली. यावेळी कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी कोरोना लस अत्यंत सुरक्षित असुन लस घेतल्यानंतर त्याचे कुठलेही दुष्परिणाम होत नसून अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरण मोहिममेची प्रभाविपणे अमलबजावणी करुन गाव कोरोनामुक्त करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करावे. याकामी कूचराई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
नागरीकांनी मास्कचा वापर, वारंवार साबनाने हात स्वच्छ धुणे, सनिटायझर, व सूरक्षीत अंतर तसेच कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यास चाचणी करून घेणे ईत्यादींसह कोरोनाच्या नियम व अटीचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य असे कळकळीचे आवाहन गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांनी जनतेला केले आहे.यावेळी डॉ. डी. आर. दिपके.विस्तार अधिकारी तेलतूंबडे, डी.एस.पवार, आरोग्य सेविका एल.डी.चेलपीलवार, सरपंच मधुकर उईके, यांचेसह गावातील नागरिक उपस्थित होते.