टेकडा मार्ग सुरू होणार कधी… सातत चार वर्षांपासून बंद…. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

137

सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम डोंगराळ व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा टेकडा ताला पासून रेगुंठा हा मार्ग सातत चार वर्षांपासून बंद आहे.
कंत्राटदार नविन रस्ता बनविण्यासाठी चार वर्षां आधी खोदकाम करुन बंद करण्यात आलेला आहे. काही पुल पुर्ण बांधकाम झालेला आहे.काही बांधकाम आर्धवट झालेला आहे.
या भागात काम करणा-या कंत्राटदार हा नक्षल पेक्षाही मोठा आहे.नक्षलांनी अडवून ठेवलेली रस्ता पोलीसांनी दोन तासात मोकळा केला जातो. पण कंत्राटदारांनी अडवून ठेवलेली रस्ता कोण मोकळा करणार ?
टेकडा मार्ग सुरू होणार कधी?, करणार कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
या परिसरातील नागरिकांना चार वर्षांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.