समस्या व अडचणी बाबत वन संरक्षण समिती निमलगुडम च्या वतीने वनपरिक्षत्र अधिकारी कमलापूर यांना निवेदन

74

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- सिरोंचा वनविभाग,कमलापूर वनपरिक्षेत्र, राजाराम उपक्षेत्र,तिमरम नियतक्षेत्रा अंतर्गत निमलगुडम येथे सण 2001 साली वन संरक्षण समिती गठित करण्यात आली होती.आजच्या घडीला समितीला 20 वर्षे पूर्ण झाली आहे. वन विभाग व गावाला जोडणारा केंद्र बिंदू म्हणून वन समिती नेमली जाते.
सदर समितीच्या माध्यमातून वणाआधारीत कामे करणे, वनगौण खरेदी करून गावाला आर्थिक लाभ उपलब्ध करून देणे, गावाला आर्थिक प्राप्तीचे प्रकल्प राबविणे,75% अनुदानावर गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे,गावात विकासात्मक कामे हाती घेणे असे नियोजन समितीचे असतो.या पूर्वी समितीच्या माध्यमातून वनातील कामे,गावात प्रत्येक कुटुंबात गॅस कनेक्शन वाटप केले आणि करून समितीच्या लाभ रक्कमेतून गावात समाजउपयोगी भांडे, पडदे, साउंड सिस्टम खरेदी करून गावाला उपलब्ध करून दिले होते.परंतु आजच्या घडीला वन संरक्षण समिती निमलगुडम समिती नाममात्र असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत झालेल्या कामाचं लाभातून समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी अनेक गाव उपयोगी वस्तू व कामाचा ठराव मांडले परंतु आसश्वासनाशिवाय काहीच लाभ झाला नाही.तर समितीचे लाभ रक्कम गेली कुठे? असा प्रश्न समितीला व गावकऱ्यांना पडला आहे.
गेल्या एक वर्षांपासून समितीचे कोणत्याही प्रकारची सभा घेतली नाही तसेच समितीला मिळणारी लाभाचे माहिती सुद्धा देण्यात आले नाही. वन संरक्षण समितीचे सचिव पद माहे-मार्च 2020 पासून माहे आज पर्यंत बि.बि.निमरड क्षेत्र सहाय्यक कमलापूर यांच्याकडे कार्यभार असून सदर सचिव पद राजाराम क्षेत्र सहाय्यक ए.बि.राखडे याना देण्यात आले नाही.करिता सदर समितीचे सचिव पद त्वरित बदलवून देणे, समितीचे पदाधिकारी व सदस्य गण पुनर्गठन करण्यास त्वरित आदेश द्यावा.अन्यथा आपण आमच्या विनंतीनुसार कारवाई न केल्यास समिती बरखास्त करण्यात येईल व वरिष्ठ स्थरावर निवेदन देऊन न्याय मागण्यात येईल असा इशारा वन समितीच्या शिष्टमंडळ व निमलगुडम गावकऱ्यांच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापूर यांना दिलेल्या निवेदनातुन मागणी केले आहे.
यावेळी सदर निवेदन वनपरिक्षत्र अधिकारी मा.घुगे साहेब यांना देताना समितीचे शिष्टमंडळ आनंदराव कोडापे, नागेश शिरलावार,नागेश कोडापे, कैलास पोरतेट, सीताराम पेंदाम, सत्यवान आत्राम आदींनी उपस्थित होते.