आरमोरी येथील तहसील कार्यालयाच्या मागील भागात कचरा गाडीचा बेजबाबदारपणा

कचरा गाडीच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक हैराणबेजबाबदार पणा करणाऱ्यावर कारवाई करावी कलीराम गायकवाड यांची मागणी

197

 

 

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दाखल न्यूज भारत

आरमोरी :- आरमोरी तहसील कार्यालयाच्या मागील भागात कचरा गाडी चा बेजबाबदारपणा उघडकीस आलेला आहे.
कचरा गाडीच्या बेजबाबदारपणामुळे आरमोरी तहसील कार्यालयाच्या मागील भागातील रहिवासी नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आरमोरी नगरपरिषदेची कचरा गाडी कर्णकर्कश आवाज करीत येते, मागच्या गल्लीतून पुन्हा कर्णकर्कश आवाज करीत निघून जाते. मात्र पुढच्या गल्लीतील नागरिक घरातील कचरा काढून कचऱ्या सह दारात उभे राहून कचरा गाडीची वाट पाहत उभे असतात. परंतु तेवढ्यात सदर कचरा गाडी पुन्हा कर्णकर्कश आवाज करीत वापस निघून जाते. ते पुन्हा न येण्यासाठी .
नागरिक तो कचरा सांभाळत गाडीच्या पुढील फेरीची वाट बघत असतात . परंतु गाडीचा नेहमीप्रमाणे कर्णकर्कश आवाज करून मागच्या गल्लीतून येऊन पुन्हा वापस जाते. परंतु कचरा घेऊन जात नाही . त्यामुळे आरमोरी तहसील कार्यालयाच्या मागील परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
या कचरा गाडी चा बेजबाबदारपणाचा प्रकार गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे.
या कचरा गाडी चा बेजबाबदारपणा थांबवावा व नागरिकांना होणारा त्रास थांबवावा. अशी आरमोरी तहसील कार्यालयाच्या मागच्या परिसरातील नागरिकांनी मागणी केलेली आहे. व कचरा गाडी चा बेजबाबदारपणा करणार्यांवर कारवाई करावी अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.
तरी सदर प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित समस्या सोडविण्याचे करावे अशी ही आग्रही मागणी कलीराम गायकवाड व नागरिकांनी केलेली आहे.