राज्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन !- लावावा लागणार – पहा काय म्हणाले मुख्यमंत्री ?

575

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी
महाराष्ट्र:- राज्यातील स्थिती गंभीर होत असल्याने – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली – तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही – अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे ,

मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?

मुख्यमंत्र्यांनी सांगितले लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास , तो एकमताने घेतला गेला पाहिजे – लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो.
राज्यात मुख्यमंत्री 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा विचार करत आहेत – 8 किंवा 14 दिवसानंतर एक एक गोष्ट – हळू हळू सुरु करु – अशी भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे – तर तज्ञाच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक आहे.

दरम्यान उद्या टास्कफोर्सची बैठक घेण्यात येईल – या बैठकीतच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल – असेहि आज मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.