क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती कोविड 19 चे पालन करीत उत्साहात साजरी कुंभा येथील पाणी टंचाई ची समस्या आठ दिवसात दुर करणार- सरपंच अरविंद ठाकरे

41

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

मारेगाव: महात्मा ज्योतिबा फुले यांची कुंभा येथे जयंती साजरी करण्यात आली. ज्योतिराव
गोविंदराव फुले हे भारतातील महान विचारवंत, समाजसेवक लेखकासह शिक्षणसम्राट होते. त्यांचे विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी बहुमोलाचा वाटा आपल्या पत्नीसह उचलला होता. तर समाजाने आपल्यावर चिखल फेकले, दगड फेकले तरीही त्यांनी आणि सावत्रिबाई फुले यांनी महिलांना शिक्षण देण्याचा ध्यास कधीच सोडला नाही.

जयंतीचे औचित्य साधून अरविंदभाऊ ठाकरे सरपंच कुंभा यांनी ग्वाही दिली की,
कुंभा मधील पाणी टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने गावातील हद्दपार झालेली रामपूर ते कुंभा जीर्ण अवस्थेतील नळ योजनेला युद्धस्तरावर दुरुस्ती करून, नवसंजीवनी देऊन गावातील पाणी व्यवस्था येत्या आठ दिवसात सुरू करून कायम स्वरूपी पाण्याची समस्या मिटविण्याचे अभिवचन दिले. पाणी समस्येचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता मात्र सरपंचांनी आश्वासन दिले की आठ दिवसात पाणी समस्येचा निपटारा करत हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार.

क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती निमित्त गावातील अनेक नागरिक ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. कुंभा गावातील महत्वपूर्ण पाणी समस्यांचा निपटारा करून खऱ्या अर्थाने जयंती साजरी करण्यात आली त्याबद्दल सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाचे गावकऱ्यांनी आभार मानले.