माळी समाज कोंढाळातर्फे महात्मा फुले जयंती साजरी -जयंतीला माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले उपस्थित

67

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे थोर समाजसुधारक,वैचारिक क्रांतीचे जनक,समाज प्रबोधक महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास माळी समाजातर्फे
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अगदी साध्या पद्धतीने माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून साजरी करण्यात आली.
जयंती निमित्त माजी पंचायत समिती सभापती देसाईगंज तथा देसाईगंज काँग्रेस तालुका अध्यक्ष परसराम टिकले प्रामुख्याने उपस्थित होते.माळी समाज मंदिर येथे महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांच्या प्रतिमेसमोर टिकले यांनी दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून अगदी साधेपणाने जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांनी माल्यार्पण केले.
महात्मा फुले जयंती निमित्त ग्रामपंचायत उपसरपंच गजानन सेलोटे,माजी पंचायत समिती उपसभापती नितीन राऊत,ग्रामपंचायत सदस्य संदिप वाघाडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन राऊत, पोलिस पाटील किरणताई कुंभलवार,माळी समाज अध्यक्ष नामदेव वसाके,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,माळी समाज सचिव केशव वसाके,ओ बी सी मोर्चा तालुका अध्यक्ष देसाईगंज पंकज धोटे,विलास ढोरे,रामदास गुरूनूले,आक्रोश शेंडे,वासुदेव बुराडे,विनोद राऊत व माळी समाज कोंढाळा प्रामुख्याने उपस्थित होते.