कोसरी (चव्हेला) येथे लघुसिंचन प्रकल्प च्या नहराच्या वेस्ट वेअर चे खोलीकरण करा माजी आमदार आनंदराव गेडाम यांची चद्रपुर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कडे निवेदनातून मागणी.

76

 

सदाशिव माकडे ८२७५२२८०२०

आरमोरी :
परिसरातील कोसरी (चव्हेला) येथे लघुसिंचन प्रकल्प बांधण्यात आला आहे. या सिंचन प्रकल्पाचा कालव्याच्या वेस्टवेअरची उंची कमी असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन नुकसान होत आहे तसेच ठिकठिकाणी फुटला असल्यामुळे वेस्ट शेअरची उचिवाढऊन कालवा दुरुस्त करावा अशी मागणी कोसरी येथील शेतकऱ्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या कडे केली होती या आधारावर माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी चंद्रपूर विभागाच्या पाटबंधारे प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता यांच्या कडे कोसरी लघुसिंचन प्रकल्पाच्या वेस्ट वेअर नहराची उंची वाढतऊन फुटलेल्या नहराची दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

गेल्या तेरावषापुवी विलास राव देशमुख मुख्यमंत्री असताना तत्कालीन जलसंपदामंत्री डाॅ सुनिल देशमुख व तात्कालीन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आनंदराव गेडाम असताना यांनी 1980 च्या वनकायद्यामुळे रखडलेला कोसरी हा सिंचन प्रकल्प मार्गी लावला होता 35 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात अशा परिस्थितीत आरमोरी तालुक्यातील कोसरी हे सिंचन प्रकल्प मंजुर करण्यात आले होते कोसरी लघु पाटबंधारे योजनेतून बाधीत होणाऱ्या वनक्षे‌त्राच्या मोबदल्यात वनविभागास ८०२ लाख रुपयाचे नक्त मालमत्ता मुल्य भरुण या योजनेमुळे 775 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे यात कामे अंतिम टप्पेवर असून
चव्हेला लघुसिंचन प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो हेक्टर जमिनीला जलसिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. कालव्याच्या माध्यमातून शेतापर्यंत पाणी पोहोचविले जाते. मात्र, कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. तसेच वेस्ट वेअर नहराची उंची कमी असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरुन शेतकऱ्यांची मोठ्या त्यामुळे पाण्याचा अपव्यय होते. परिणामी, शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही. पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आपसात भांडणे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाट दुरुस्त करावा,
यासाठी शेतकऱ्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या कडे समस्या सांगितले असता याची दखल घेऊन माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी स्वता शेतकऱ्यां समवेत कोसरी लघु सिंचन प्रकल्प ची पाहणी करुण केली असता वेट वेअरचे खोदकाम शेतकऱ्यांच्या शेताच्या वर व जागोजागी फुटले असलेल्या ने पावसाच्या दिवसांत शेतकऱ्यांच्या पिकात पाणी साचत असल्याने शेतकऱ्यांचे पिकाची नुकसान होत असल्यामुळे चंद्रपुर विभागाचे लघुसिंचन पाटबंधारे अधिक्षक अभियंता यांच्या कडे कोसरी लघुसिंचन प्रकल्पाच्या वेस्ट वेअर नहराची खोलीकरण व दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
यावेळी दिगेश्वर धाईत रामचंद्र निकुरे.रेमाचद निकुरे राजेंद्र पोटाशी तुकाराम वैरकार नामदेव वाटगुरे केवळराम दुगा अनिल कोटरगे भाईचद गूरुगुले वाल्मीक मोहुले यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.