वडधा येथील बायपास रस्त्याची समस्या खूप दिवसांपासून प्रलंबित बायपास रस्त्याची समस्या त्वरित सोडवा

 

अश्विन बोदेले
ग्रामीण प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

वडधा:- वडधा या गावातील बायपास रस्त्याची समस्या आजही कायम आहे खूप दिवसापासून ही समस्या प्रलंबित असून वारंवार याचा पाठपुरावा करूनही या मागणीकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
वर्धा हे गाव आजूबाजूच्या परिसरातील मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून गणल्या जाते. त्याचप्रमाणे हे गाव महत्त्वाचे मानले जाते. वडधा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक वडधा येथे छोट्या-मोठ्या कामानिमित्त येत असतात. त्यामुळे वडधा येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते . त्यामुळे ही वर्दळ टाळण्यासाठीअनेक वर्षापासून बायपास रस्त्याची मागणी होत आहे. मात्र अजून पर्यंत प्रशासनाने वडधा येथे बायपास रस्त्यांची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे प्रशासना प्रति नागरिकांचा रोष वाढलेला आहे. परिणामी प्रशासनाने या बाबीची तात्काळ दखल घेऊन पर्यायी मार्ग म्हणजेच बायपास मार्गांची व्यवस्था करून देण्यात यावी. अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.