पालकमंत्र्याच्या पोकळ घोषणा, अंमलबजावणी शून्य,आरोग्य विभागाचे वाजले तीन तेरा मुख्यमंत्रीना विदर्भ मजदूर काँग्रेस नगर सेवक देवेंद्र बेले व नगर सेवक अशोक नागपुर तर्फे निवेदन पटविली

318

 

दख़ल न्यूज़ भारत :शंकर महाकाली

चंद्रपूर : जिल्हातिल आरोग्य सेवा मिळणया साठी देवन्द्र बेले व अशोक नागापुर ने मुख्यमंत्रीला पत्र पटविली मागील एक वर्षांपूर्वी पासून कोविड-१९ या विषाणूच्या महामारीने संपूर्ण जगाला आपल्या कव्हेत घेतले. युद्ध पातळीवर संशोधात्मक व उपचारात्मक वैद्यकीय कार्य करून अनेक देशांनी या महामारीवर मात करण्याचे प्रयत्न केले व या महामारीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. बऱ्याच प्रमाणात ही महामारी नियंत्रणात आली,
त्या दरम्यानच्या काळात चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीनी कोविड-१९ च्या महामारीला हद्दपार करण्यासाठी कपोल कल्पित व मनोरंजक अशा घोषणांच्या पावसामुळे लोकांच्या मनात दिलासाच्या/समाधानाचा गारवा निर्माण झाला, आता या वर्षीच्या सुरवातीलाच कोविड-१९ च्या महामारीने थैमान घालणे सुरू केले आणि हाहाकार माजविला.पालकमंत्र्याच्या गतवर्षीच्या घोषणांची अंमलबजावणी प्रत्यक्ष कृतीतून न साकरल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र उदा.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय व याच्याशी संबंधित जिल्ह्यातील आरोग्य केंद्र ही वैद्यकीय व अन्य सुविधांचा अभावामुळे सुरू असलेल्या कोविड-१९ च्या महामारीला रोखण्यासाठी पूर्णतः असमर्थ ठरले आहेत. या असमर्थ पणाचे मूळ कारण पालकमंत्र्याच्या पोकळ घोषणा परंतु कृती शून्य अंमलबजावणी हे आहे,
१) पालकमंत्र्यानी ६ एप्रिलला महिला रुग्णालयात १०० खाटांचे कोविड रुग्णालयाचे उदघाटन केले असले तरी जनरेटर, फायर ऑडिट, डॉक्टर व परिचारिका नसल्यामुळे सुरू झालेले नाही. कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना आणि कोविड रूग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.जिल्ह्यात ६१ डॉक्टर्स, १३५ परिचरिकांच्या जागा रिक्त आहे तसेच २० के.एल.चे २ ऑक्सिजन पॉईंट सुरू झाले नाही. जिल्हा प्रशासन कागदावरच सर्वकाही सुरळीत दाखवत असले तरी सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
२)महिला रुग्णालयात ३०० ऑक्सिजन बेडची गरजेनुसार घोषणा केली होती. परन्तु तृर्त घटकेला येथे ३०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली नाही म्हणजे गंभीर कोरोनाग्रस्तवर तातडीची उपाययोजना करण्यासाठी ऑक्सिजन बेडची व्यवस्था नसल्याने अनेकांना कोरोनाला बळी पडावे लागत आहे. तरी ३०० ऑक्सिजन बेडची तात्काळ व्यवस्था करणे गरजेचे आहे.*
३जिल्हा सामान्य रुग्णालयात फक्त १६० ऑक्सिजन बेड व ८० साधे बेड अशी व्यवस्था आहे ही व्यवस्था अपुरी असून येथेसुद्धा १०० बेडची तात्काळ व्यवस्था करणे गरजेचे आहे.
४) कोरोनाच्या गंभीर रोग्यांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन बेड वार्डमध्ये फिजिशियन डॉक्टर्स २४ तास उपलब्ध असणे गरजेचे आहे. हे फिजिशियन डॉक्टर फक्त सकाळी व सायंकाळी व्हिजिट देऊन निघून जातात आणि त्यांचा अनुपस्थित रोग्यांना औषधेउपचार करणे हे महत्वपूर्ण कार्य ठेकेदारी पध्दतीने लावलेले वैद्यकीय कर्मचारी करतात*
५)वन प्रशिक्षण संस्था मूल रोड चंद्रपूर येथे कोरोना आजाराचे केंद्र आहे व येथे क्वारंटईन केलेले कोविड रुग्णांना ठेवण्यात येते व त्यांना प्राथमिक स्वरूपाचे (गोळ्या देणे व अन्य उपचार) दिले जातात. मात्र हे रुग्ण जेव्हा गंभीर होतात व त्यांना ऑक्सिजन गरज असते तेव्हा त्यानां चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतर करण्यात येते. परन्तु नेमके त्यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने या रोग्यांची हेळसांड होते किंबहुना त्यांचा कडे दुर्लक्ष होते व परिणामतः या गंभीर रोग्यांना मृत्युमुखी पडावे लागते, ६)कोरोना रुग्णांना उपचारार्थ भरती केल्यानंतर त्यांना आवश्यक औषधीचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र शासकीय रुग्णालयात तसेच आरोग्य केंद्रात रेमडेसीवीर, ऑक्सिजन व अन्य औषधाचा पुरेसा पुरवठा उपलब्ध राहत नाही. ७)जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर उपचार्थ भरती केलेल्या रुग्णांची माहिती त्यांचा नातेवाईकाना व्हावी यासाठी दवाखान्यातील कोरोना रुग्ण सम्बधित माहिती देण्यासाठी माहिती कक्ष उघडण्यात यावे, ८)त्याचप्रमाणे कोरोना रुग्ण कक्षेत उपचारार्थ जे फिजिशन डॉक्टर्स असतात त्यांची नावे व कामाचा कालावधी नमूद केलेले फलक उपचार केंद्रचा प्रथम दर्शनी लावण्यात यावा.
९)जिल्ह्यात कोविड टेस्टिंग सेंटर जास्तीत जास्त उभारावे कोविड – १९ विषाणूच्या प्रभावाने निर्माण होणारी कोरोना महामारीचा दुसरा स्ट्रेंथ येणार अशी दाट शक्यता निर्माण झाली होती. यवतमाळ, नागपूर, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ असल्याचे दर दिवशी निदर्शनास येत होते. अशावेळी चंद्रपूर जिल्ह्यात परिस्थिती ही पूर्णतः नियंत्रणात होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय व याच्याशी सबंधित जिल्ह्यातील आरोग्य केंद्र ही पूर्णतः कोविड-१९ च्या विषाणूशी लढण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी प्रतिकार करण्यासाठी व कोरोना महामारीला रोखण्यासाठी या संधीचा पूर्व तयारीसाठी पुरेपूर उपयोग करता आला असता परन्तु चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्राच्या वेळीच याबाबीकडे लक्ष न पुरविल्यामुळे कोरोनाशी लढणारी ही संपूर्ण यंत्रणा निष्क्रिय अवस्थेत पडून राहिली. त्याचे परिणाम आज संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला भोगावे लागत आहे.यामध्ये एक वर्षापासून ऑक्सिजन बेडची तयारी करणे,निष्णात फिजिशन डॉक्टर्स उपलब्ध करून ठेवणे तसेच डॉक्टर्सच्या जोडीला आवश्यक असणारा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध करून ठेवणे हे झाले असते तर हे सगळे कोरोना योद्धे कोविड-१९ चा नायनाट करायला यशस्वी ठरले असते आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची महामारी पाय पसरू शकली नसती