मोबाईल आणि माणूस लेखन :- श्री. सुदर्शन शांताराम जाधव – चोरवणे ता. खेड जि. रत्नागिरी.

131

 

मोबाईलमुळे माणसा- माणसातला संवाद कमी झाला आहे का :- सवांद कमी झाला नसला तरी पूर्वी सारखा संवाद माणसामध्ये राहिला नाही.आज मोबाईलमुळे खूप लोक जोडली गेली आहेत. घर बसल्या आपण दूर असलेल्या आपल्या नातेवाईक किंवा मित्र परिवार यांच्याशी संवाद साधता येतो.
तरुण पिढी आणि मोबाईल :-पुर्वीचा काल आणि आताच काल यामध्ये खूप फरक आहे.पूर्वी मोबाईल नव्हता तरुण पिढी आपल्या आई वडील यांच्या आदेशानुसार वागत होती.बाप आणि मुलगा यांच्यात संवाद कायम होतो.आता तो संवाद कमी होत आहे.आजचा तरुण मोबाईल मध्ये इतका बुडाला आहे की आपल्या आईशी, वडिलांशी संवाद करत नाही. तरुण पिढी मोबाईल मध्ये इतकी व्यस्त झाली आहे की वाईट प्रवृत्तीकडे जात आहे.योग्य काय आणि वाईट काय हे तरुण पिढी लक्षात घेत नाही.
मोबाइल वापराचे फायदे आणि तोटे :- घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे चांगला देत आहे त्यातील चांगले गुण किंवा चांगली माहिती घ्यावी. प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक व्यक्तीचा बघण्याचा दृष्टीकोण वेगवेगळा आहे.मोबाईल आला तर खूप काही माणसाच्या जीवन शैलीत बदल झाला आहे.दूरवरचा माणूस जोडला गेला आहे.रोज सवांद होत आहे.अनेक घडामोडी घरबसल्या मोबाईलमुळे काही क्षणांत समजत आहेत. मोबाईलमुळे मी 2017 पासून समाजसेवेत कार्यरत आहे आणि याच मोबाईलमुळे माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला आहे. मोबाईल मुळे मी लेखक,कवी ,पत्रकार आणि समाजसेवक अशा क्षेत्रात झेप घेतली केवळ मोबाईलमुळे. आज अनेक लोक मोबाईल मुळे जोडली गेली आहेत. पण हाच मोबाईल चांगल्या गोष्टीसाठी न वापरता नको त्या गोष्टीसाठी वापरला तर अतिरेक होऊन माणूस नको त्या मार्गाला जात आहे.मग मानसिक ,शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
मोबाईलमुळे मानवी शरीरात होणारे बदल आणि नुकसान :-पूर्वी लोक प्रत्येक काम आपल्या ठरलेल्या वेळेनुसार करत होती.लोक सकाळी 5 वाजता उठायची रात्री 9 वाजेपर्यंत झोपायची अशी दिनचार्या ठरलेली होती .पण मोबाईलमुळे रात्री 1 किंवा 2 वाजता मानूस झोपत आहे, सकाळी 10 वाजता उठत आहे.त्यामुळे भोजनाची वेळ बदलून गेली आणि त्याचा परिणाम पचन क्रियेवर झाला आहे.त्यामुळे माणूस आजारी पडत आहे.रात्री उशीरा झोपलेला माणूस त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या दिवसाच्या कामावर होत आहे.
मोबाईलमुळे नातेसंबंध दुरावले आहेत :- मोबाईलमुळे अनेक लोक जोडली गेली.परंतु जो पूर्वीचा समोरासमोर जो संवाद होत होता तो मात्र दुरावला आहे.प्रत्येक कार्यक्रम किंवा शुभ प्रसंगी माणूस हजर राहत होतो पण आज माणूस मोबाईल वरून शुभेच्छा किंवा संदेश देत आहे.
पूर्वी सारखी माया, आपुलकी ,प्रेम भावना लोप पावत आहेत. केवळ मोबाईलवर नाते राहिले आहे.ती पूर्वीची नाती माणूस विसरत चालला आहे.पुढच्या पिढीला आपली लोक कोण आहेत ती माहीत पडणार नाहीत.नातेसंबंध संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण होत आहे.
मोबाईल आणि मानवी जीवन :-मोबाईल आणि माणूस यांचे नाते इतके जवळ आहे की मोबाईल शिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. आजच्या युगात मानवी जीवनाचा महत्त्वाचा घटक मोबाईल बनला आहे.घरबसल्या मोबाईल वर काम होत आहे. घरबसल्या बँकेत न जाता पैसे पाठवू शकतो. मोबाईल म्हणजे जीवनच काय असेच झाल्यासारखे वाटत आहे.

श्री. सुदर्शन शांताराम जाधव
चोरवणे ता. खेड
जि. रत्नागिरी

दखल न्यूज भारत