कोजबी-वैरागड परिसरात गुरांना माता रोगाची लागण लस उपलब्ध करून शिबिर घेण्याची ग्रामस्थांची मागणी

 

अश्विन बोदेले
ग्रामीण प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

कोजबी :- कोजबी व इथून पाच किलोमीटर अंतर असलेल्या वैरागड येथे व आजूबाजूच्या परिसरात गुरांना माता रोगाची लागण झाल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आता गुराढोरांना काही रोगांची लागण होताना दिसून येत आहे. त्यामुळे पशु पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोजबी ते वैरागड या परिसरात गुरांना माता रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात रोज उपचारासाठी गुरे आणण्यात येत आहेत. परंतु तिथे पुरेशी सोय उपलब्ध होत नाही. परिणामी गुरांना उपचाराविना वापस आणावे लागत आहे. म्हणून पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन गावा गावात शिबिर आयोजित करावे. व गुरांवर उपचार करावे व या माता रोगाच्या साथी पासून गुरांना मुक्त करावे. असे परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे.
ऐन शेतीच्या हंगामात गुरांना माता रोगाची लागण निर्माण होणे हे एक संकटच निर्माण झालेले आहे. माता रोगाची लागण झाल्यामुळे गुरांच्या शरीरावर सुजन निर्माण होऊन त्याची इजा पोहोचत आहे. त्यामुळे गुरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होऊ शकते. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन गावागावात पशुवैद्यकीय शिबिर घेण्याचे करावे असे परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे.
व गुरांना आजार झाला आहे तो आजार आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी व शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवावे असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.