राज्य शासनाच्या नियमाचे पालन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपनाने साजरी करावी असे आव्हान कन्हान ठाणेदार मा.सुजितकुमार क्षीरसागर यांनी केले.

58

 

पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र):– कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रार्दुभाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाच्या नियमाचे पालन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपनाने साजरी करावी असे आव्हाहन परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक कन्हान ठाणेदार मा.सुजितकुमार क्षीरसागर यांनी कन्हान पोलीस स्टेशन येथे १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य झालेल्या बैठकीत नागरिकांना केले आहे .
शनिवार दिनांक १० एप्रिल २०२१ ला कन्हान पोलीस स्टेशन येथे १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन कन्हान शहरात परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे यावर्षी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्य शासनाच्या नियमाचे पालन करुन साधेपणाने साजरी करावी असे सूचना देण्यात आल्या असुन कुणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सार्वजनिक स्मारक प्रतिमा चौक , तसेच बुद्ध विहार येथे ५ पेक्षा जास्त एकत्रित येऊन नये व बाईक रॅली , प्रभात फेरी , आॅर्केस्ट्रा , पथनाट्य , व्याख्यान , आणि सादरीकरण चे कार्यक्रम आयोजित न करता सर्वांनी घरी राहून आपल्या परिवारा सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरी साजरी करावी असे आव्हाहन परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक कन्हान ठाणेदार मा.सुजितकुमार क्षीरसागर यांनी नागरिकांना केले आहे .या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत वाघमारे , निखिल रामटेके , रजनीश मेश्राम , अखिलेश मेश्राम शैलेश माटे , विकी उके , नितीन मेश्राम , सह आदि अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .