प्रदेश महामंत्री बावनकुळे यांची तहसील कार्यालय पारशिवनी तसेच लसीकरण व covid सेंटर येथे भेट पाहणी आढावा बैठक संपन्न

54

 

पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल भ्या भारत,नागपुर

पाराशिवनी(ता प्र):-पारशिवनी तालुकात वाढत्या कोरणा चा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता प्रशासन स्तरावर कुठल्या प्रकारच्या नियोजन आखण्यात आलेले आहे याचा आढावा घेण्याकरिता पारशिवनी येथे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नायाब तहसीलदार, राजेन्द्र सयाम, वैद्यकीय परिचारक यांच्यासह सर्वा अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्यक्ष लसीकरण केंद्र तसेच, त्या ठिकाणी आवश्यक साधन सामग्री ची पूर्तता लवकरात लवकर व्हावे याकरिता प्रत्यक्ष विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली व पारशिवनी मध्ये तज्ञ डॉक्टरांचा अभाव तसाच नव्याने उघडलेलं रुग्णालय या ठिकाणी आवश्यक असणार्‍या ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था व आवश्यक वैद्यकीय व्यवस्थे करिता परिपूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले .पारशिवनी तालुक्यातील महात्मा गांधी महाविद्यालय येथे कोविड१९कोरोणा चाचणी सेन्टर येथे व्यवस्था ची पाहणी केली व आरोग्य कर्मचारी यांची समस्या ऐकुन त्यावर तजगा काढण्याचे चे आश्वासन दिले तसेच कोरोना कशा प्रकारे नियंत्रित करता येईल तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांचा अधिकाऱ्यांना कसल्या प्रकारची साथ असली पाहिजे याबद्दलची सूचना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना तसेच उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली .
याप्रसंगी जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, भाजपा ग्रामविकास आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश ठाकरे, पारशिवनी मंडळ अध्यक्ष अतुल हजारे, जिल्हा परिषद सदस्य वेंकट कारेमोरे , जयराम मेहरकुळे, कमलाकर मेंघर, अरशद शेख,श्याम भिमटे,फाजितराव ,भोयरजी,राजेश कडू, प्रतीक वैद्य, अशोक कुथे, लीलाधर बर्वे , रिंकेश चवरे , आकाश वाढनकर, सौरभ पोटभरे, मनीष मडावी, सेवक गेडाम आदी उपस्थित होते.