चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपूरी शहर ठरते आहे. कोरोना हॉटस्पॉट, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे

198

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
उपसंपादक-९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहत असल्याने, नागरिकांनी कोरोनाबाबत गंभीर होऊन, नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन ब्रम्हपूरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील ब्रम्हपूरी शहर हेत्रकोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून आजघडीला शहरातील कोव्हिड केअर सेंटर तथा एका खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या १५० बेडपैकी कोरोना रुग्णांसाठी एकही बेड उपलब्ध नसल्याने, ब्रम्हपूरी शहरातील तसेच तालुक्यातील रुग्णांना चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथे जाऊन उपचार घ्यावा लागण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये एक महिन्यात ४४१ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून, ग्रामीण भागातील ११३ रुगण आढळल्याने ब्रम्हपूरी तालुक्यात चिंतेची बाब ठरली असून, ३ रुगणांचा म्रुत्यू झाला आहे. त्यामुळे तिन ठिकाण कंटेंनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, तरीपण शहरात व तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एका शासकीय वसतीग्रुहामध्ये कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात येत असून, दोन खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, शासनाने घालूनक्षदिलेल्या अटी व शर्थींचे काटेकोर पालन करून, प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच स्वत:ची व स्वत:च्या कुटूंबाची काळजी घ्यावी. कोरोना सद्रुश्य आजाराची लक्षणे दिसताच ताबडतोब कोरोनाची तपासनी करून घ्या.
अतिशय महत्वाचे म्हणजे कोरोनाची तपासणी केली असता, तपासणीअंती रिपोर्ट फक्त पॉझिटीव्हच येतो असा जनतेमध्ये झालेला गैरसमज दुर करावा असे कळकळीचे व भावनीक आवाहन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले आहे. तालुक्यात व शहरात दि. १ मार्च ते ९ एप्रिल २०२१ पर्यंत ५४९६ नागरिकांचे स्वॉब घेऊन तपासणी करण्यात आली. त्यात शहरातील ४६३४ तर ८६२ ग्रामीन भागातील नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी शहरातील ४६३४ नमुन्यांची तपासणी केली असता, २८४ रुग्ण आरटिपीसीआर चाचणीत तर १५७ रुग्ण अँटीजेन चाचणीत असे एकूण ४४१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून, ग्रामीण भागातील एकूण ८६२ रुग्णांपैकी ३१ रुग्ण आरटिपीसीआर तर ८२ रुग्ण अँटेजीन असे एकूण ११३ रुगण ग्रामीण भागात आढळून आले.
सदर आकडेवारीवरून ग्रामीण भागाचे तुलनेत शहरातील रुग्ण वाढीची संख्या दुप्पट असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. रुग्ण वा नातेवाहीकांनी प्रशासनाकडे होमक्वारंटाईसाठी आग्रह धरू नये. शहरातील सध्याची स्थिती एकूणच गंभीर असल्याने कोरोनाचा फैलाव रोखन्यासाठी सर्वपक्षीय नेते, व्यापारी यांनी १० दिवस तरी शहर कडकडीत बंद ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन, सहकार्य करावे. अन्यतः याचे गंभीर परिणाम सर्वांना भोगावे लागतील असे ईशारा वजा आवाहन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला शहरातील जनतेने सहकार्य करण्याची खरी गरज आहे.