मूलचेरा येथे शिवसेनाकार्यकर्ता बैठक संपन्न. जन सेवा हीच ईश्वर सेवा असून सर्व शिवसैनिकानी मत भेद बाजूला सारून एकजुटीने कार्य करावे. जिल्हाप्रमुख मा. सुलवावार

140

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
मो. न. 8275228020
(गडचिरोली जिल्हा)

जिल्हा गडचिरोली तालुका मूलचेरा येथे दिनांक 29/07/20 रोजी तालुक्यातील स्थानिक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता बैठक मा. राजगोपाल भाऊ सूलवावार, शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात घेण्यात आली, या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देणे, शेताऱ्यांच्ये समस्या सोडविणे, तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी उपयोजनाविषयक आराखडा तयार करणे, कोविळ 19 कोरोणा जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी शासन प्रशासन विभागाने दिलेल्या सूचना प्रचार प्रसार करून जनहितार्थ कार्य करणे असे अनेक विषयावर चर्चा करण्यात आली असून समस्त पदाधिकरी व कार्यकर्त्याच्या परवानगीने पुढे करावयाच्या कार्याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमुख प्रभारी, धर्मराज रॉय, तालुका प्रमुख, नीलकमल मंडल, तालुका प्रमुख, अक्षय करपे, उप तालुका प्रमुख, दिलीप सूरपाम्म, निलेश येमुलावार, ठाकूर जी, कंनाके भाऊ, शाखा प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित राहून सदर बैठक शिवसेना जिल्हा प्रमुख, यांनी सर्व पदाधिकारी वर्गाशी विचारमंथन करून दिलेले कार्य जबाबदारीने करावे असे जाहीर आवाहन कार्यकर्त्यांना केले व जन सेवा हीच ईश्वर सेवा असून सर्व शिवसैनिक कामाला लागावे. मत भेद बाजूला सारून कार्य करावे असे एकजुटीने काम करीत राहण्याचे आदेश ह्या बैठकीत आपल्या संबोधनातून यावेळी व्यक्त केली.
जय हिंद जय महाराष्ट्र