मोहझरी येथील नालीचा उपसा करावा- नरेश सोनुले आणि मोहन मोहूर्ले यांची ग्रामपंचायतकडे मागणी

162

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

मोहझरी:- आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील वामन निकुरे ते जिल्हा परिषद शाळा मोहझरी पर्यंत काही वर्षांपूर्वी नाली बांधकाम करण्यात आले होते .परंतु गेल्यावर्षी संपूर्ण नाली उपसा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आज या नाल्याची परिस्थिती बघता संपूर्ण नालीमध्ये माती तसेच शौचालयाचा सांडपाणी या नालीमधून वाहने बंद झाल्याने तलाव असल्याचे भासतआहे. या नालीवरती कुठल्याही प्रकारचे छाकण नसल्यामुळे काही गावातील महिला घरचा केरकचरा या नालीमध्ये आणून टाकतात त्यामुळे ही नाली पानी, केरकचरा आणि मातीने तुडुंब भरून असल्यामुळे या नालीतून पाणी वाहणे बंद झालेले आहे त्यामुळे गावातील नागरिकांना दुर्गंधीचा वास येत आहे .

त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जागोजागी नालीत पाणी साचल्याने त्या ठिकाणी डासांची पैदास होऊन या डासापासून लोकांना विविध आजार होण्याची संभावना अधिक आहे. त्यामुळे मोहझरी गावातील संपूर्ण नाल्याचा न उपसा केल्याने नागरिकांच्या आरोग्याची खेळ करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. अशा दुर्गंधीमुळे नागरिक आजारी पडले तर याला जबाबदार कोण ? तरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहझरी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण गावातील नाल्याचा उपसा करून स्वच्छ कराव्या अशी मागणी मोहझरी येथील नरेश सोनुले आणि मोहन मोहूर्ले यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केलेली आहे. नाली उपसा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिलेला आहे.