व्यापारी बांधवांनो सेवा देतांना स्वतःची सुद्धा योग्य काळजी घ्या…. राकेश खुराणा.. लक्षणे दिसताच सावध व्हा :- व्यापारी असोसिएशन आपल्या पाठीशी….

115

 

विशाल ठोबंरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

गेल्या वर्ष भरापासून सर्व व्यापारी मित्र कोरोनाशी सबळ पणे लढा देत आहे. काहींना त्यात आपले प्राण सुद्धा गमवावे लागले, सातत्याने सेवा देत असल्याने कोण कसा येतो व आपल्याला संसर्ग करून जातो अशा अनेक बाबी लक्षात घेता व्यापारी बांधवांनी सेवा देत असतांना स्वतःची सुद्धा काळजी लक्षणे दिसतात सावध व्हावे व तसा उपचार सुरू करावा एका व्यापाऱ्याच्या मागे सुद्धा तितकाच व्याप असतो जितका सर्वसामान्यांच्या मागे त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुद्धा आपली काळजी घेऊनच व्यापार करावा, वेळप्रसंगी सर्व व्यापारी एकत्र आहोच असे मत व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेश खुराणा यांनी व्यक्त केले.
कोरोनाची दुसरी लाट जगात भयावह असून संपूर्ण वर्ष दुखमय परिस्थितीत पार पाडावे लागले, दरम्यान अत्यावश्यक सेवा लक्षात घेता व्यापारी वर्गाणी यात कमालीची साथ सर्वत्र दिली आहे, व्यापारी हा आर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसतात त्वरित वेळ न घालवता डॉक्टरांना पाचारण करून उपाययोजना करावी.
कारण व्यापाऱ्यांच्या मागे देखील खूप मोठा व्याप आहे त्यांचे कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून आहे, भयावह परिस्थिती लक्षात घेता अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सुद्धा बेड चा तुटवडा पडत असल्याची चिंताजनक परिस्थिती दिसत असून व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास व्यापारी असोसिएशन वणी त्यांच्या सोबत आहे त्यांनी खचून न जाता परिस्थितीचा सामना करावा, जमेल तितकी स्वतःची काळजी घ्या कारण आपण सुरक्षित तर आपला ग्राहक सुरक्षित असे यावेळी व्यापारी असोसिएशन वणी चे अध्यक्ष राकेशजी खुराणा यांनी बोलून दाखविली.