Home शैक्षणिक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये मुलींनी मारली बाजी मागील १५वर्षांपासून...

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये मुलींनी मारली बाजी मागील १५वर्षांपासून १०० टक्केनिकालाची परंपरा ९७.८०% गुण मिळवून कु आदिती भालेराव श्रीरामपूरात प्रथम.

170

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
श्रीरामपूर दिनांक २९जुलै:
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या राज्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज चा निकाल १०० टक्के लागला असून ९७.८० टक्के गुण मिळवून कु आदिती प्रसाद भालेराव शाळेसह श्रीरामपूर प्रथम आली आहे.
शाळेच्या स्थापनेपासून सर्व क्षेत्रांमध्ये श्रीरामपूर तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी करणारी शाळा तसेच श्रीरामपूरतील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मागील १५ वर्षापासून सातत्याने १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही अबाधित राखली. यावर्षी कु आदिती भालेराव ९७.८० टक्के गुण मिळवून श्रीरामपुरात प्रथम आली तसेच कु वेदांता डाके ९३.८०%.कु समृद्धी धनवटे ९३.४०, कु भूमी आदमाने ९३.४०% व कु श्रावणी कुलकर्णी ९३.२०% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ६४ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १७ विद्यार्थ्यांना ९०% याच्यावर गुण प्राप्त झाले तसेच ५४ विद्यार्थ्यांना ७५% याच्यावर गुण प्राप्त झाले. तर १० विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे कु आदिती,कु समृद्धी व कु भूमी या तिघीही शाळेतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,प्राचार्य डॉ बाळासाहेब अंबाडे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleकाळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय मालखेडचा दहावीचा निकाल शंभर टक्के.
Next articleमूलचेरा येथे शिवसेनाकार्यकर्ता बैठक संपन्न. जन सेवा हीच ईश्वर सेवा असून सर्व शिवसैनिकानी मत भेद बाजूला सारून एकजुटीने कार्य करावे. जिल्हाप्रमुख मा. सुलवावार