साकोलीत लॉकडाऊनचा पहिला शनिवार यशस्वी ; विनामास्क रिकामटेकड्यांवर पोलीस विभागाची दमदार कामगिरी

57

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

साकोली : वाढता कोरोनामुळे शासनाने भंडारा जिल्हा लॉकडाऊन शनिवार व रविवार घोषित केला असता आज साकोलीत पोलीस प्रशासनाने सकाळपासून कडक बंदावस्थेत बंदोबस्त लावित विनामास्क ट्रिपल सीट व रिकामटेकड्यांवर जबरदस्त कारवाईची तंबी देत लॉकडाऊन शहरात यशस्वी केला.
शहरात आज सकाळपासून साकोली पोलीस ठाणे निरीक्षक जितेंद्र बोरकर यांचे मार्गदर्शनात लाखांदूर रोड चौक येथे वाहतूक पोलीस कर्मचारी निल गोस्वामी, पीएसआय खोब्रागडे, पो.शि. आशिष गरासे, होमगार्ड हेमराज येरणे, हरीभाऊ लांजेवार व एकोडी रोड चौक येथे पीएसआय कुळकर्णी, आश्विन भोयर ( वाहतूक ) पो. शि. भालचंद्र अंडेल, होमगार्ड प्रेमलाल राणे, सुलन तिरपूडे यांनी बंदोबस्त लावित शहरातून विनामास्क ट्रिपल सीट रिकामटेकड्यांवर जबरदस्त कारवाईची मिसाल कायम केली तसेच शहरातील प्रमुख प्रभागात पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांचे चमुने गस्त लावित विनाकारण जमावगर्दी, विनामास्क टवाळखोरांना तंबी देऊन शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी सुचना दिल्या व नागरीकांना आवाहन केले की शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यास तात्काळ पोलीस कारवाई करण्यात येईल असे सांगितले.