अत्यंत गरजू लोकांना अगोदर घरकुल दया- नागरिकांची मागणी

155

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

आरमोरी :- शासनाच्या योजनेअंतर्गत गोरगरीब , दारिद्रय रेषेखालील व पात्र लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ दिला जातो याकरिता अटी शर्तीची मर्यादा घातली गेली आहे . मात्र , पात्र लाभाथ्यांना कागदपत्राचे कारण देत डावलण्यात येत असून दुसरीकडे धनाढ्यांना घरकुलाचा लाभ दिल्या जात असल्याचा प्रकार होताना दिसून येत आहे . त्यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठांनी याकडे जातीने लक्ष देऊन पात्र लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे .जे नागरिक झोपडीत वास्तव करतात ते ग्रामपंचायतला दिसत नाहीत का? ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे अश्यांना अगोदर घरकुल द्यायला पाहिजे परंतु ग्रामपंचायत स्तरावरून सेटिंग करून धनाढ्य व्यक्ती लाभ घेतात त्यामुळे माहितीच्या अधिकार गरजूंनी लावून ती पात्र घरकुलची यादी मागून संपूर्ण माहिती घेतली पाहिजे .ग्रामीण भागातील पात्र लाभाथ्यांना शासनाच्या घरकूल योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी घातलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्रांची पूर्तता करावी लागते . अनेक गरजूंना घरकुलाची गरज असताना व केवळ कागदपत्राअभावी अपात्र ठरविले जात आहे . तर दुसरीकडे धनाढ्यांना या योजनेचा लाभ दिल्या गेल्याचीओरड पात्र लाभाथ्यांकडून होत आहे . प्रशासकीय भोंगळ कारभाराचा परिणाम पात्र लाभार्थ्यांवर अन्याय करणारा ठरत आला आहे . अनेक ठिकाणी पात्र लाभाथ्यांची नावेच घरकूल यादीत समाविष्ट नसतो . तर उलट जे सक्षम , धनाढ्य आहेत , अशांची नावे यादीत येत असल्याने पात्र लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत आहे . परिणामी गरजू व पात्र लाभार्थ्यांवर शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेसह अन्य घरकूल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे . तर याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे .