काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय मालखेडचा दहावीचा निकाल शंभर टक्के.

166

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्रात आज दहावीचा निकाल जाहीर झाला, यामध्ये शहरातील शाळांसोबत ग्रामीण भागातील शाळांनी देखील घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये खडकवासला ग्रामीण भागातील काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय मालखेड या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला, दहावीच्या परिक्षेसाठी बसलेले सगळेच्या सगळे विद्यार्थी हे या परिक्षेत उत्तीर्ण झाल्याने या शाळेचा निकाल हा शंभर टक्के 💯लागल्याने, विद्यार्थी व शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालाने शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, यामुळे ग्रामीण भागातील देखील शाळा ह्या शहरापेक्षा कमी नाही हे आले. या शाळेत ग्रामीण शेतकरी व शेतमजुरांची मुले शिक्षण घेतात, त्यांना कुठल्याही प्रकारच्या क्लास उपलब्ध नसतो, तरी हे विद्यार्थी उत्तुंग यशाला गवसणी घालतात ही कौतुकास्पद कामगिरी आहे. याबद्दल तेथील शिक्षकांचा देखील या यशात मोठा योगदान आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.