दीर आणि सासरा करायचे……व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करून 22 वर्षीय महिलेचे लैगिंक शोषण

419

हर्ष साखरे दखल न्युज भारत

जयपूर : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय विवाहितेचे दीर आणि सासर्‍याने लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत धाव घेतली आहे.
राजस्थानमध्ये एका 22 वर्षीय महिलेच्या दीर आणि सासर्‍याने लैंगिक शोषण केले आहे. वयाच्या 17 वर्षीच या महिलेचे लग्न झाले होते. तेव्हापासून सासरा आणि दीराने तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरूवात केली. हा सगळा प्रकार नवर्‍यालाही माहित होता, पण त्याने दुर्लक्ष केले. पीडित महिलेने आपल्या सासूला सांगितले पण सासूने तिला मारहाण करून गप्प बसवले.
पीडित महिलेचा सासरा आणि दीर तिच्यावर अत्याचार करत आणि त्याचा व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करत. अखेर कसातरी धीर एकवटून तिने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.