कोरोनाचा मालेवाड्यात शिरकाव, ४ रुग्ण आढळले

200

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारतभर थैमान घातले आहे. त्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. केवळ शहरच नाही तर गाव-खेड्यात सुद्धा कोरोनाचा शिरकाव होऊन कित्येक लोक ग्रसित व्हायला लागले आहेत. यात गडचिरोली जिल्हा सुद्धा सुटलेला नाही. जिल्ह्यातील मालेवाडा याठिकाणी ९ एप्रिल रोजी एका वेळेस चार रुग्ण आढळून आले आहेत.
यात पोलीस मदत केंद्रातील एक जवान, पी.एस.सी.कॉलनीतील एक, मार्केट लाईन मधील एक टेलर व एक स्त्री रुग्ण यांचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण मालेवाडा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. चारही रुग्णांवर सध्या कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.