Home शैक्षणिक बांदल स्कूलचे घवघवीत यशाची परंपरा राखली दहावी परीक्षेचा निकाल ९८.०७  टक्के ...

बांदल स्कूलचे घवघवीत यशाची परंपरा राखली दहावी परीक्षेचा निकाल ९८.०७  टक्के संस्थेचे चेअरमन आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्याकडून विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन

158

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण : दहावीच्या परीक्षेत येथील पेरेन्टस् एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मीबाई मारूतीराव बांदल स्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे.५२  पैकी  ५१  विदयार्थी  अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९८.०७  टक्के लागला आहे. कु. अरूणकुमार गुप्ता याने ९२.२० टक्के गुण मिळवून प्रथम, कु. रूपेश कोळी याने ८७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु. श्रेया पालांडे हिने ८६.४० टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक पटकावला.
चिपळुणातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा अषी बांदल स्कूलची ओळख आहे. चिपळुणातील असंख्य विद्यार्थ्यांनी या शाळेतून शिक्षण घेवून नावलौकिक मिळवला आहे आणि ही परंपरा आजही सुरू आहे. काही वर्षापूर्वी ही शाळा बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आली होती. त्यावेळी माजी मंत्री व आमदार श्री. भास्करराव जाधव हे पुढे आले. सर्वसामान्यांच्या मुलांना माफक शुल्कामध्ये इंग्रजी शिक्षण घेता यावे म्हणून २००९ मध्ये त्यांनी शाळेची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच विदयार्थी शाळेत होते. परंतु, आ. श्री. जाधव यांनी शाळा ताब्यात घेतली आणि अल्पावधीतच  शाळेचं रूपडं बदललं. आज शाळेची पटसंख्या कितीतरी पटीने वाढली आहे. नवीन प्रवेशासाठी रांगा लागत आहे, इतकं परिवर्तन त्यांनी घडवून आणले आहे.
आमदार श्री. जाधव यांनी शाळेला केवळ नावलौकिकच मिळवून दिला नाही तर त्यापुढे जावून विद्यार्थ्यांना जे जे पाहिजे ते उपलब्ध करून दिलं, शिक्षकांना प्रोत्साहन दिलं आणि पालकांचा विश्वास संपादन केला. परिणामी गेल्या दहा वर्षात शाळेचा दहावीचा निकाल सातत्याने १०० टक्के लागत आला आहे. यावर्षीही शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कु. अरूणकुमार गुप्ता याला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ. प्रणिता शिंदे यांच्यासह दिलीप घाग, वहिदा परकार, नयना बागुल, माणिकराव पाटील, सैमा माद्रे तसेच मनिशा काणेकर, अश्विनी साठे, सिध्दी सावर्डेकर, स्नेहल गोंधळेकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी गुणवंत विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे चेअरमन आमदार श्री. भास्करराव जाधव आणि संस्थेच्या संचालकांनी अभिनंदन केले आहे.

दखल न्यूज भारत

Previous articleवरोरा – चिमूर महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करावे याकरिता टायगर ग्रुप च्या वतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन
Next articleकाळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय मालखेडचा दहावीचा निकाल शंभर टक्के.