गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने उप पोलीस स्टेशन पेरमिली येथून प्रोजेक्ट कृषी समृद्धी योजनेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांना मिळाले शेवगा लागवडीचे मोफत मार्गदर्शन

95

 

संपादक-जगदिश वेन्नम//रमेश बामनकर- तालुका प्रतिनिधी

गडचिरोली :- आदिवासी बहुल म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा शेती व शेती संसाधनांच्या बाबतीत मागासलेला असून त्यांना प्रगत शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याकरिता व त्यांचे जीवनमान उंचविण्याकरिता गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट कृषी समृद्धी राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो.यांच्या संकल्पनेतून उपपोस्टे पेरमिली येथे शेवगा शेती लागवड व प्रशिक्षण कार्यक्रम दि.०९ /०४/२०२१ रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलिस उप निरीक्षक धनंजय पाटील लिखित शेवगा लागवड पुस्तिकेचे प्रकाशन मा.पोलिस अधीक्षक अंकित गोयल सो.यांच्या हस्ते करण्यात आले.त्याच बरोबर शेती संबंधित मार्गदर्शनपर व्हिडीओचे सादरीकरण व शेतकऱ्यांना पोलिस अधीक्षकांच्या हस्ते १५००० शेवगा रोपांचे वाटप करण्यात आले.त्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना पोलीस अधीक्षकानी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकाशिवाय इतर उत्पादने घेताना दिसून येत नाही.शेती हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता अधिक उत्पन्न वाढीचा स्त्रोत बनवा यासाठी शेतकरी बांधवांना नवीन पीक पध्दतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, मोफत बि-बियाणे व रोपे वाटप करून कृषी विषयक जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहे.कृषी समृद्धी उपक्रमाअंतर्गत प्रायोगिक तत्वावर जिल्हाभरातील होतकरू व गरजू शेतकऱ्यांना मोफत शेवगा रोपे वाटप करण्यात येणार आहे.या मुळे तुमचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल.आणि शेवगा शेंगामुळे आर्थिक लाभ मिळणारच त्याच बरोबर शेवगा शेंगा व झाडाची पाने पौष्टिकतेत अतिशय समृद्ध आहे असे सांगितले.त्यावेळी शहीद स्मृती स्थळ एक खिडकी योजनेचा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रम मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो.यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.कार्यक्रमास मा.मनीष कलवानीया सा.अप्पर पोलिस अधीक्षक(अभियान),मा.सोमय मुंडे सा.अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी, मा.राहुल गायकवाड सा.उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी,नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि.महादेव शेलार सा.पोउपनि.पंकज सपकाळे सा.प्रभारी अधिकारी उपपोस्टे पेरमिली,पोउपनि.धनंजय पाटील उपपोस्टे पेरमिली, सरपंच किरण नैताम ग्राम पंचायत पेरमिली,उपपोस्टे पेरमिली चे अधिकारी, पोलीस अंमलदार, शेवगा शेती करून भरघोस उत्पन्न घेणारे शेतकरी मौजा आलदंडी येथील वारलु नैताम व अहेरी उपविभागातील शेतकरी बांधव उपस्थित होते.