निरा नरसिंहपुर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील काम चालु आसताना  पुरातन काळातील 4 तळघर किंवा (पेव) आढळून आले आहेत.

लक्ष्मी नरसिंह मंदिरात पूर्व दरवाजा बाजूस तळघर किंवा (पेव) पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

1152

 

निरा नरसिंहपूर दिनांक:9 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार. 

नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथे लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यातील अंतर्गत  काम चालू असताना. मंदिराच्या पूर्व दरवाजा भागात माती काम करीत असताना कामगाराला पुरातन काळातील तळघर किंवा (पेव) आढळून आलेले आहे. तळघराच्या वरील भाग हा सुमारे दीड ते दोन फूट रुंदीचा असून आतील भाग हा दहा फूट रुंदीचा आहे. याच पेवघराची उंची अंदाजे बारा ते पंधरा फूट खोल आहे. मातीकाम करीत असताना असे एकूण चार तळघर किंवा (पेव) आढळून आलेले आहेत. हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.

ऐतिहासिक अभ्यासकाला संशोधन करण्याची संधी आहे.

————————————————–

फोटो:- ओळी- लक्ष्मी नरसिंह विकास आराखड्यातील काम करीत असताना आढळलेली 4 तळघर