दुकानदार संघाचा सदस्यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथील नवनियुक्त पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर यांची भेट घेत निवेदन देण्यात आले

80

 

पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र ):-आज कन्हान कांन्द्री दुकानदार महासंघाचा सदस्यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथील नवनियुक्त पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर यांची भेट घेत निवेदनाद्वारे सांगितले की , मागील एक वर्षापासन देशासह राज्यात व कन्हान शहरात कोरोणाचा प्रदुर्भाव वाढत आहे अशातच राज्य सरकारने दिलेले आदेश नियम आम्ही दुकानदार व शहरवासी काटेकोरपणे पालण करीत आहे पण कोरोणाचा वाढता प्रभावाने वारंवार लॉकडाऊन ,संचारबंदी लावण्यात येत असून यामधे दुकानदारांचे जगणे कठीण झाले आहे , दुकानदारांना उपासमारीची शक्यता जास्त बळावली आहे जर कन्हानमधील आरूढ शासन प्रशासनाने समन्वायाची भुमिका दाखवली तर दुकानदार हे कसेबसे तरी दुकाने नियमाप्रमाणे सुरु करू शकते व त्याचे काटेकोरपणाने पालन ही करायला तयार आहे अशी ग्वाही दुकानदार संघाचा सदस्यांनी ह्या वेळेस दिली तसेच पोलीस उपअधिक्षक सुजिकुमार क्षिरसागर यांनी म्हटले की, राज्य सरकार कडनं दिलेला निदर्शनाचे नियमाचे पालन करण्यात यावे ,दुकांनदाराने कोरोणा कोव्हीड 19 चाचणी तपासणी रिपोर्ट पत्र ठेवणे बंधनकारक आहे अन्यथा कार्रवाही करण्यात येईल इत्यादीबाबद चर्चा करीत निवेदन देण्यात आले तसेच नगर परीषद मुख्याधिकारी यांनाही ह्याबाबद अवगत केले ह्यावेळेस उपस्थीत दुकानदार महासंघाचे सचिव प्रशांत बाजीराव मसार, सचिन गजभिए,शिवशंकर हलमारे, प्रदीप गायकवाड,अशोक मोरपाणा,बापु चकोले,ज्ञानेश्वर राजुरकर,अविनाश हातागडे,कमलेश हटवार ,चेतन वैद्य, योगेश दुहिजोड,सुनिल लक्षणे आदी सदस्य उपस्थीत होते .