MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

100

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी
महाराष्ट्र:- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर अधिकारी यांची व्हीसीमार्फत बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. MPSC आयोग आगामी काळात कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन या परीक्षेची नवी तारीख जाहीर करणार आहे.