राजवर्धन पाटील यांची पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास भेट

91

 

नीरा नरसिंहपूर :दि: 9 प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार, 

नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पाडेगाव ( जि. सातारा ) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रास शुक्रवारी (दि.9) भेट दिली व शास्त्रज्ञांशी संवाद साधला. याभेटीत ऊस पिकावर सुरू असलेल्या विविध संशोधनांची, नवीन वाणांची व आधुनिक पीक पद्धतीची माहिती राजवर्धन पाटील यांनी घेतली.

यावेळी राजवर्धन पाटील यांनी एम.एस.10001, को. 86032, फुले 265 तसेच चाचणी सुरू असलेल्या को.9057 या वाणांच्या ऊस प्रक्षेत्रांना भेटी देऊन पीक लागवडीची माहिती घेतली. इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुद्ध गुणवत्तेचे बेणे वापरल्यास उत्पादनात भरीव वाढ होऊन, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल, असे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी ऊस विशेष तज्ञ डॉ. भरत रासकर, डॉ. सुभाष घोडके, डॉ.रामदास गारकर यांनी राजवर्धन पाटील यांना ऊस पिकांच्या नवीन वाणांची व चालु असलेल्या विविध प्रकारच्या संशोधनांची माहिती दिली. याप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी डी.एम.लिंबोरे, ए.आर.पवार आदी उपस्थित होते.

________________________________

फोटो- नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास भेट दिली.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160