दिलासादायक बातमी कोब्रा जवानाची ६ दिवसानंतर नक्षलांनी केली सुटका

233

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

छत्तीसगड:- छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वर सिंह मनहास यांची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. 7 एप्रिल रोजी राकेश्वर सिंह मनहास यांचा एक फोटो समोर आला होता. हा फोटो नक्षलवाद्यांनी जारी केला होता. त्याशिवाय सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंह अद्याप जिवंत असल्याचा दावा केला होता. कोब्रा जवान राकेश्वर मनहार 6 दिवसांनंतंर नक्षलवाद्याच्या तावडीतून सुटले आहे. सरकारने गठण केलेल्या दोन सदस्यीय मध्यस्ती टीमचे सदस्य पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैयासह शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांनी जवानाची सुटका केली.

सुटकेनंतर मध्यस्ती केलेली टीम जवानाला घेऊन बासागुडा येथे परतत आहे. जवानाच्या सुटकेसाठी मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या दोन सदस्यीय टीमसह बस्तरच्या 7 पत्रकारांची टीमदेखील उपस्थित आहे. नक्षलवाद्यांनी बोलावल्यानंतर जवानाची सुटका करण्यासाठी बस्तर येथील बीहडमध्ये वार्ता दलासह एकूण 11 सदस्यांची टीम पोहोचली होती. अद्याप या प्रकरणात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सुटका करण्यासाठी नक्षलवाद्यांच्या कोणत्या अटी होत्या, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या अटींबाबत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे.