भारत विद्या मंदिर कुंभा शाळेचा निकाल उकृष्ट

 

प्रतिनिधी/रोहन आदेवार

मारेगाव: राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यात कुंभा येथील भारत विद्यामंदिर कुंभा शाळेचा निकाल 94.71टक्के उकृष्ट असा लागला असून शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

भारत विद्या मंदिर कुंभा विद्यालयात 89 विद्यार्थी होते. त्यापैकी 88 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातून 83 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 94.71 टक्के लागला आहे.

कुमारी सुजाता पंढरी चौधरी 500 पैकी 427 मार्क्स 85.40 टक्के व कुमारी प्रणाली राजू शेंडे 500 पैकी 427 मार्क्स 85.40 टक्के घेऊन प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कुमारी आकांक्षा मारोती खंगार 500 पैकी 421 मार्क्स 84.20 टक्के घेऊन पास झाले. सर्व विद्यार्थी खेडेगावातील असून कोणतीही ट्युशन न लावता शाळेतील शिक्षकाने शिकवलेल्या व विद्यार्थ्यांने केलेल्या मेहनती मधून पास झाले.