पिंपळगाव/स.येथील एल आय सी कार्यालयाचे शुभारंभ थाटात संपन्न पिंपळगाव क्षेत्रात एल आय सी ग्राहकांच्या सेवेकरीता प्रथमच झाले कार्यालय स्थापन

121

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

साकोली : साकोली व लाखनी यांच्या मधील मुख्य गाव पिंपळगाव क्षेत्रातील जनतेला लाखनी किंवा साकोली पर्यंत एल आय सी कार्यालय गाठावे लागत होते पण ग्राहकांना हा त्रास होऊ नये यासाठी एल आय सी क्षेत्रातील प्रथम स्थानावर बाजी मारलेली पुजा नरेश कुरंजेकर यांच्या अभिनव प्रयत्नाने पिंपळगाव या दोन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती क्षेत्रातच एल आय सी कार्यालय उघडल्याने ग्राहकांची विशेष सोय तयार झाली हे उल्लेखनिय.
भारतीय जीवन विमा निगमच्या साकोली शाखा व लाखनी उपशाखा अंतर्गत पिंपळगाव/स. मध्ये एल आय सी आधिकृत प्रीमियम पॉईंट व पॉलिसी सर्व्हिसिंग कार्यालयाचे उदघाटन दि. ८ एप्रिलला सायं ६ वा. लाखनी उपशाखेचे शाखाधिकारी मनोज भोतमांगे व साकोली शाखेचे चंद्रकांत लिखार यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी पिंपळगाव येथील एल आय सी ग्राहक व गावातील प्रतिष्ठीत मान्यवर मंडळी उपस्थित होते.