जांभूळघाटचा लक्ष्मण घाडगे करतोय वैध अंतर्गत अवैधपणे मूरुमाचे दररोज भरमसाठ उत्खनंन.. — चिमूर तहसीलदार संजय नागटिळक यांचा पुर्ण आशिर्वाद! — २ वर्षात फक्त ३ हजार २५० ब्राश मूरुम उत्खननाचा तात्पूरता परवाना..मूरुम उत्खननाचे कारण व्यवसाय.. — केवळ १० ठिकाणावरून ४७ वेळा दाखविण्यात आले आहे मूरुम उत्खनंन परवाना.. — १२ ट्रक,२ ट्रॅक्टर,२ जेसीबी द्वारे चालतंय उत्खननाचे काम.. — केवळ ५० ब्राश मूरुम उत्खननाला ५ दिवसांची मूदत..याच मुद्दतीत चालतोय अवैध मूरुम उत्खननाचा भरमसाठ गोरख धंदा.. — दम आहे तर चौकशी कराच? — उद्याच्या संपदकिय मध्ये शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा उत्खनंनातंर्गत सातबारा उतारा —

213

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यात अवैध मूरुम उत्खनना द्वारे भरमसाठ आर्थिक पिक मिळविता येत असल्यामुळे,अवैध मूरुम उत्खननाच्या पिका अंतर्गत मौजा जांभूळघाट येथील लक्ष्मण घाडगे हा करोडो रुपयांचे पिक वर्षागणिक घेत असल्याचे गांभीर्य पूर्वक वास्तव्य पुढे आहे.लक्ष्मण घाडगेच्या भरमसाठ अवैध मूरुम उत्खननाकडे चिमूर तालुकातंर्गत महसूल विभाग पुर्णतः दुर्लक्ष करीत असल्याने,तहसीलदार संजय नागटिळक यांचा त्यांना पुर्णपणे आशिर्वाद असल्याचे दिसते आहे.
दिनांक १ जानेवारी २०१९ ते ३ एप्रिल २०२१ या कालावधीत लक्ष्मण भानुदास घाडगे यांनी २९ वेळा ५० मूरुम ब्राशचा तर १८ वेळा १०० मूरुम ब्राशचा तात्पूरता उत्खनंन परवाना तहसील कार्यालय चिमूर येथून काढलेला आहे.
भुमापण क्रमांक ४४ जांभूळघाट येथून ८ वेळा,भुमापण क्रमांक ३२ जांभूळ घाट येथून २० वेळा,भुमापण क्रमांक ४२ जांभूळघाट येथून ३ वेळा,कसरबोडी भुमापण क्रमांक ६५ व कसरबोडी रिठ भुमापण क्रमांक ६२ येथून प्रत्येकी २ वेळा,निमढेला रिट भुमापण क्रमांक ०५ येथून २ वेळा,आंबोली भुमापण क्रमांक ४६३ व ६०७ येथून प्रत्येकी १ वेळा,शिवनपायली भुमापण क्रमांक ३८७,येथून १ वेळा तर भुमापण क्रमांक ३८८ मधून ३ वेळा,चक कवडसी भुमापण क्रमांक १८ येथून २ वेळा,भिसी भुमापण क्रमांक ८०३ येथून १ वेळा,जांभूळघाट भुमापण क्रमांक ०१ येथून १ वेळा,अशा पध्दतीने ४७ वेळा तात्पुरता मूरुम उत्खननाचा परवाना लक्ष्मण घाडगे यांनी घेतलेला आहे.
लक्ष्मण घाडगे यांच्या प्रत्येकी ५० ब्राश मूरुम उत्खननचा तात्पुरता परवाना ५ दिवस मुदतीचा आहे तर प्रत्येकी १०० ब्राश मूरुम उत्खनंनाचा तात्पुरता परवाना सुध्दा ५ दिवसांचाच आहे. लक्ष्मण घाडगे यांच्याकडे १२ ट्रक आहेत,२ ट्रॅक्टर आहेत व २ जेसीबी आहेत.लक्ष्मण घाडगे यांना ५० ब्राश व १०० ब्राश मूरुम उत्खनंनाचा तात्पुरता परवाना देताना सारखी मुदत दिली असल्याचे तहसील कार्यालयातील दप्तर सांगते.
मात्र,लक्ष्मण घाडगे हा वैध मुरुम उत्खनंनाच्या तात्पुरत्या परवाना अंतर्गत अवैधपणे भरमसाठ मुरुमाचे उत्खनंन करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.त्याचे मूरुम भरुन दररोज वारंवार धावणारे ट्रक व टॅक्टर अवैध मूरुम उत्खननाची खात्री देतात.
असे असताना चिमूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार संजय नागटिळक,हे लक्ष्मण घाडगे यांच्या भरमसाठ अवैध मूरुम उत्खननाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पुढे आले आहे,यामुळेच लक्ष्मण घाडगे यांना त्यांचा खुप मोठा आशिर्वाद असल्याचे जाणवते आहे.लक्ष्मण घाडगे यांच्या वैध अंतर्गत अवैध मूरुम व्यवसायाकडे तहसीलदार संजय नागटिळक जाणिवपूर्वक दुर्लक्ष का म्हणून करतात?हे गुलदस्त्यातील कोणते कोडे आहे, या कोड्याचे सुत्र तहसीलदार संजय नागटिळकच सांगू शकतात.
तहसीलदार संजय नागटिळक यांच्या कार्यकाळात अवैध गौण खनिज उत्खननाला बिनधास्त वाव मिळाला असून,रेती-मूरुम-माती तस्कर अवैध उत्खनन करणास सदासर्वदा बेलगाम सक्रिय आहेत हे चिमूर तालुक्यातील जनता उघड्या डोळ्यांनी दररोज पहाते आहे.
लक्ष्मण घाडगे यांच्या प्रत्येक ठिकाणच्या मूरुम उत्खनंन खड्यांची इतंभूत चौकशी करणे आवश्यक असताना,तहसीलदार संजय नागटिळक व त्यांची टिम चूप बसली आहे.यावरुन हे लक्षात येते की चिमूर तालुक्यातील अवैध गौणखनीज उत्खननात राजकीय लोकप्रतिनिधींचा अप्रत्यक्षाती प्रत्यक्ष हात अशू शकतो.