दखल न्युज भारत’ वेब न्युजच्या ‘उपसंपादक पदी’ पत्रकार पंडित मोहिते-पाटील यांची नियुक्ती

राज्यातील प्रत्येक समाजाला पत्रकारितेतुन न्याय मिळावा, पत्रकारितेतुन समाजात समाज हक्काचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत आणि कोठे तरी समाजहक्का विषयीचे वातावरण हे संपूर्ण राज्यात निर्माण व्हावे ही मनिषा सदैव मनात ठेऊन पत्रकारिता आणि लेखणीतून प्रखर विचार ठेवणारे पत्रकार व लेखक मा.श्री.पंडित मोहिते-पाटील यांची ‘दखल न्यूज भारत’ वेब न्युज पोर्टलच्या “उपसंपादक पदी” ‘दखल न्यूज भारत’चे मुख्य संपादक – मा.श्री. प्रदीप रामटेके सर यांनी दि.२८ जुलै २०२० रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मा.श्री.पंडित मोहिते-पाटील यांनी पत्रकारिता व लेखक, म्हणून गेल्या काही वर्षापासून दैनिक बाळकडू मध्ये ‘मुंबई महानगर विभाग प्रतिनिधी’ म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांनी “दैनिक बाळकडू” वृत्तपत्रात केलेले विशेष कार्य वाखाणण्याजोगे आहे. सामाजिक एकतेचे, सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले आहे आणि आजही ते करत आहेत. भारतीय सामाजिक पातळीवर समाज घटकातील समाजसेवेच्या कार्याची आम्हाला प्रचितीही आहे. त्यांचे कार्य समाजाला नवी दिशा देणारे आहे.

राज्यातील तमाम समाज घटकांच्या घराघरात एकतेचा नारा देणारे ‘दखल न्युज भारत’ या वेब न्यूज पोर्टलला युवा शक्तीचा बुलंद आवाज पोहोचविण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील घटकापर्यंत निभीॅड पत्रकार व लेखक म्हणून कार्य करीत राहो याच सदिच्छासह त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा व खूप खूप अभिनंदन…!

शुभेच्छुक
मुंबई विभाग – प्रतिनिधी
१) दिलीप अहिनवे
२) बाळू राऊत
३) सुरेंद्र खानविलकर
४) सुनिल दुसारिया
५) ऋषिकेश विचारे
६) संतोषकुमार राय
७) प्रसाद पुत्रण
८) शशांक शिंदे