आणि….. ट्रक उलटा धावला

108

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

चंद्रपूर:- वेकोली वणी क्षेत्रातील निलजई 2 येथील खुल्या कोळसा खाणीत गुरुवारी कोळश्याने भरलेला हायवा ट्रक पलटी झाला ज्यामध्ये वाहनचालक हा किरकोळ जखमी झाला.

निलजई 2 या खुल्या कोळसा खाणीत कोळसा हायवा ट्रक मध्ये लोड केल्यावर हायवा ट्रक उंच भागात जायला निघाला मात्र काही अंतरावर ट्रक पोहचला असता वाहनात तांत्रिक बिघाड झाला व तब्बल अर्धा किलोमीटर ट्रक वेगात मागील बाजूस आला, वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला, या अपघातात वाहनचालक केशव थेरे किरकोळ जखमी झाला.
हायवा ट्रक क्रमांक mh34 ab 8789 चे नुकसान झाले, सदर हायवा ट्रक हा सपरा ट्रान्सपोर्ट कंपनीचा आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी न झाली नाही.