ग्राम पंचायत राजाराम येते तेंदु संकलन बाबत चर्चा प.स.सभापती भास्कर तलांडे यांच्या प्रमुख उपस्थिती

95

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- अहेरी पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत राजाराम येते आज कोष समिती,साधन संम्पती व यांच्या सभा घेण्यात आले.
सदर सभेत आगामी होणाऱ्या तेंदु हंगामा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आले असुन कोरोनाच्या सर्व नियम पाडून दिनांक १६-४-२०२१ ला ग्राम पंचायतीचे सर्व सदस्यगण कोष समिती व साधन संम्पती अध्यक्ष,सदस्य उपस्थित राहून तेंदु लिलाव करण्यात यावी अशी चर्चा करणयात आली आहे.
सदर सभेचे अध्यक्षस्थानी राजाराम ग्राम पंचायतीचे उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकुदर होते.यावेळी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे,ग्राम पंचायत सदस्य नारायन कँबगोनीवार,ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना मारकवार,कोष समितीचे अध्यक्ष रमेश पोरतेट,सामाजिक कार्यकर्ते ऍड.एच.के.आकुदर,सुखदेव आलाम,मोबलयझर सौ.अनिता आलाम,ग्रामसेविका कु.ममता गांवडे,उपस्थित होते.