वैरागड परिसरात वादळीवारा आणि गारांसह अवकाळी पाऊस. – भाजीपाला, वीट आणि मोहफुलचे नुकसान. – जनजीवन विस्कळीत होऊन अस्ताव्यस्त.

253

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – आज संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास येथील परिसरात अचानक वादळीवारा, ढगांचा गडगडाट, विजेच्या कडकडाट आणि गारांसह अवकाळी पाऊसाने हजेरी लावित भाजीपाला, विटा आणि मोहफुल यांची अतोनात नुकसान होऊन जनजीवन अस्ताव्यस्त झाले.
अचानक संध्याकाळी आकाशात काळे ढग जमा होऊन,ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि गारांसोबत जोरदार अवकाळी पावसाने वैरागड परिसराला झोडपले. आलेल्या वळीव पाऊसाने शेतकऱ्यांनी लावलेले वांगी, फुल कोबी, पत्ता कोबी, मिरची, टमाटर, मेथी, चवळी भाजी, भेंडी, सांभार या नगदी पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्या महिन्यात वीटाभट्टी लावून विटा व्यवसाय केला जातो. अवकाळी पावसाने विटा व्यावसायिकांचा आणि विताभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांचा सुद्धा नुकसान झाले आहे. या कालावधीत मोहफुल वेचणीचा हंगाम आहे. विजेच्या कडकडक्याने मोहफुल पडणे बंद होते. यामुळे मोहफुल वेचून विक्री आणि पाळीव गुरांना चारा देणाऱ्या गरीब नागरिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
अचानक आणि एकाएकी जोरदार पाऊस सुरू झाल्याने येथील नागरिकांची सामानाची सावरा-सावर करण्यासाठी एकच धावपळ उडाली. गावातील गटार तुडुंब भरून रस्ते चिखलमय झाले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन अस्ताव्यस्त झाले. आकस्मित झालेल्या नुकसानीला शासन आर्थिक मदत करिल काय असा प्रश्न वैरागड आणि परिसरातील शेतकरी, व्यावसायिकांना पडला आहे.