लाॅकडाऊन मागे घ्यावे यासाठी, महाराष्ट्र शासनास चिमूर व्यापारी मंडळाचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पत्र..

50

 

तालुका प्रतिनिधी चिमूर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या करिता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला वीकेंड लॉक डाऊन म्हणजे फक्त व्यापाऱ्यांच्या मानेवर तलवार आहे.सर्व शासकीय यंत्रणा सुरू आहे,तसेच निवडणुका सुरू आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही काय ? असा प्रश्न उपस्थित करून कोरोनाला रोखण्याचे सरकारचे धोरण चुकीचे आहे,यामुळे सदर लाकडाऊन मागे घ्यावे या अनुषंगाने चिमूर तालुका व्यापारी मंडळाद्वारे महाराष्ट्र शासनास,चिमूर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पत्र पाठविण्यात आले.
लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका व्यापाऱ्यांना बसतो आहे, यामुळे शासनाने लॉकडाऊन बंद करावा याकरिता बालाजी महाराज बहुउद्देशीय व्यापारी मंडळ चिमूर च्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालय चिमूर यांची गुरुवारला प्रत्यक्ष भेट घेऊन लॉक डाऊन मुळे व्यापाऱ्याना भेडसावनाऱ्या समस्या बाबत चर्चा केली व समस्या बाबत अवगत करून लॉक डाऊन बंद करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळात व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी बोकारे, सचिव सारंग दाभेकर, सहसचिव पप्पु शेख, कोषाध्यक्ष प्रदीप साटोने,संचालक दिलीप राचलवार व गजाननजी शिंदे उपस्थीत होते.