खोबरमेंढा – हेटाळकसा नक्षलविरोधी अभियानात यशस्वी कामगिरी करणाऱ्या जवानांचा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सत्कार.

164

 

 

सदाशिव माकडे ८२७५२२८०२०
गडचिरोली :-
दि. २९/०३/२०२१ रोजी मौजा खोब्रारमेंढा जंगल परिसरात नक्षल मोहीम राबवित असतांना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल सी ६० जवानांनी समय सुचकता व बुद्धी कौशल्याचा वापर करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोळीबार केला सी ६० जवानांनी कोणत्याही अप्रिय घटनेशीवाय झहाल नक्षलवादी ऋषी रावजी हिचामी ऊर्फ पवन उर्फ भास्कर (डिकेएसझेडसीएम, डीव्हीसीएम ऑफ नार्थ गडचिरोली) व अन्य चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
सदर कामगिरी ची दखल घेऊन आज दि. ०७/०४/२०२१ रोजी जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते अभियानात यशस्वी कामगिरी केलेल्या अधीकारी व कमांडर यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जवानांना संबोधित करतांना मा. ना. एकनाथजी शिंदे यांनी जवानांचे अभिनंदन केले तसेच गडचिरोली पोलीस दलासाठी राज्य शासन सदैव आपल्या पाठीशी असून आपल्या पोलीस बांधवांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले त्याचबरोबर जवानांचे कौतुक करत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिले व गडचिरोली जिल्हा हा एक दिवस नक्षलमुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
नक्षलविरोधी अभियानाचे नेतृत्व करणारे अप्पर पोलीस अधिक्षक (अभियान) मनिष कलेवानिय सा. यांच्यासह १९ पोलिस अधिकारी व कमांडर यांचा सत्कार करण्यात आला . सदर कार्यक्रमास संदीप पाटील (भा.पो.से.) पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परीक्षेत्र, दिपक सिंगला (भा.प्र. से.) जिल्हाधिकारी, अंकित गोयल (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, कुमार आशिर्वाद (भा.प्र. से.) मुख्य कार्यपालन अधिकारी, समीर शेख सा. अप्पर पोलिस अधीक्षक गडचिरोली व भाऊसाहेब ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) उपस्थित होते.