वैध मुरुम उत्खनंनाच्या परवानगीत अवैध मुरुम उत्खनंन,खरबोंचा भ्रष्टाचार दाबल्या जातोय राजकीय दबावात!.. — आमदार किर्तीकुमार भांगडियांच्या भावाची,”शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी..अन्य दोन भागीदार! — कंपनीचा उदेश फक्त व्यवसाय,मुरुम गौण खनिज संपदेला विकून चिमूर तालुक्याला पोखरून टाकले.. — कंपनीची मुदत २ वर्ष १० महीणे १० दिवस. — कंपनीचे संचालक,तहसीलदार संजय नागटिळक व जिल्हा खनिकर्म अधिकारी,मंडळ अधिकारी,तलाठी यांची कसून चौकशी होणे आवश्यक! — तब्बल ३८ ठिकाणावरून उत्खनंन.. — श्रिकांत मितेश भांगडिया,नितीन लक्ष्मणराव पाच घरे,सुशील शंकरलाल कोठारी कंपनीचे संचालक.. मुंबईचा पत्ता.. — दम आहे तर चौकशी कराच?

0
643

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
कोणत्याही प्रकारचा व्यवसाय कसा करायचा,या बाबतच्या योजना भांडवलदारांच्या डोक्यातून नेहमीच बाहेर पडत राहतात,नव्हे तर सदासर्वदा डोक्यात घुमत राहतात.तद्वतच स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा दुरोपयोग कसा करायचा हे सुद्धा त्यांच्या कामाच्या कार्यप्रणाली वरुन अनुभवास येतय.चिमूर तालुक्यातील मुरुम उत्खनंनाच्या महाभयंकर अशा खरबो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सबंधीत सर्व प्रशासकीय यंत्रणेचा सद् उपयोग केला की दुरोपयोग केला हे,शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तिन्ही संचालकांना माहिती.परंतू चिमूर तहसीलदार यांच्या मुरुम उत्खनंन तात्पुरता परवांना दप्तर नोंदणी वरुन लक्षात येते की,शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक व सबंधीत सर्व प्रशासकीय यंत्रणा,यांच्या संगनमतानेच चिमूर तालुकातंर्गत मुरुम उत्खनंनाच्या माध्यमातून खरबो रुपयांचा महाभ्रष्टाचार करण्यात आला आहे.
श्रिकांत मितेश भांगडिया,नितीन लक्ष्मणराव पाचघरे,सुशील शंकरलाल कोठारी,हे तिघेजण शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असून या कंपनीचे रजिस्टर २९ में २०१८ ला करण्यात आले आहे,कंपनीचा रजिस्टर क्रमांक ३१००७४ असा आहे.सदर कंपनीची कालमर्यादा हे २ वर्ष १० महीणे १० दिवसांची होती.आजच्या स्थितीत कंपनीची कामकाजाची कालमर्यादा संपलेली आहे.या कंपनीचा उदेश केवळ व्यवसाय करणे हाच होता.परंतू कोणता व्यवसाय करायचा व व्यवसायाचा उदेश काय?या संबंधाने कुठल्याही प्रकारचे विवरण कंपनी रजिस्टर करताना नमूद करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी १३ करोड ५० लाख रुपयांची व्यवसायासाठी लागत दाखवली आहे.कंपनीच्या कालमर्यादेत ६ करोड ४८ लाख ८० हजार प्राप्त झाले असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
या कंपनीच्या संचालकांनी दिनांक १/३/२०१९ ते २/४/२०२१,पर्यंतच्या कालावधीत केवळ १०५ वेळा मुरुम उत्खनंनाचा तात्पुरता परवाना घेतला आहे.यात ९५ वेळा ५०० ब्राश,४ वेळा २०० ब्राश,२ वेळा ५० ब्राश,प्रत्येकी १ वेळा ३००,१५०,१००,ब्राश,अशा प्रकारे त्यांनी काढलेला मुरुम उत्खनंनाचा तात्पुरता परवांना आहे.१०५ वेळा काढलेल्या तात्पुरता मुरुम परवाना अंतर्गत ४९ हजार ४५० मुरुम ब्राशचे उत्खनंन तब्बल ४८ भुमापण क्रमांक वरुन केले असल्याचे तहसीलदार यांचे दप्तर सांगते.
शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी चिमूर तालुकातंर्गत केलेले मुरुम उत्खनंन हे वैध व अवैध असल्याचे मोका चौकशी स्थाळावरुन लक्षात येते व या मुरुम उत्खनंनाच्या माध्यमातून कंपनीच्या संचालकांनी चिमूर तहसीलचे तहसीलदार संजय नागटिळक,चिमूर तालुक्यातील मंडळ अधिकारी,तलाठी,उपप्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर,खनिकर्म विभाग चंद्रपूर,पोलिस विभाग चंद्रपूर,यां सर्वांना आपल्या बाजूने करीत किंवा या सर्वांच्या आशिर्वादाने खरबो रुपयांचे अवैध मुरुम उत्खनंन केले असल्याचे पुढे आले आहे.
श्रिकांत मितेश भांगडिया,नितीन लक्ष्मणराव पाचघरे,सुशील शंकरलाल कोठारी,यांनी कंपनी रजिस्टर करताना मुंबई येथील पत्ता दिला आहे.यामुळे यांची अनेक ठिकाणी चल-अचल संपत्ती असल्याचे सुध्दा लक्षात येते.
श्रिकांत मितेश भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार मितेश भांगडिया यांचे भाऊ आहेत.श्रिकांत मितेश भांगडिया हे आमदार किर्तीकुमार मितेश भांगडिया यांचे भाऊ असल्यामुळेच त्यांच्या खरबो रुपयांच्या अवैध मुरुम उत्खनंनाकडे चिमूर तहसीलचे तहसीलदार संजय नागटिळक,चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिस प्रशासन अधिकारी हे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत होते व आजच्या स्थितीत सुध्दा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते आहे.
तहसीलदार संजय नागटिळक,चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना वाटते की,शंकरपूर-चिमूर हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून मुरुम उत्खनंनाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची अनियमितता झाली नाही,तर त्यांनी स्वतः खुर्चीवर बसून अवास्तव बोलण्यापेक्षा मैदानात निघावे व मुरुम उत्खनंन मोका स्थळावर जावून प्रत्यक्ष मोजमाप करावे.
परंतू तहसीलदार संजय नागटिळक यांच्या कार्यपद्धतीवर व कर्तव्यावर विश्वास ठेवता येत नाही,तद्वतच खरबो रुपयांच्या अवैध मुरुम उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची भुमिका व वर्तणूक पुर्णतः शंकाजनक आहे हे नाकारता येत नाही.
परत्वे भाऊ आमदार असलेल्या कार्यक्षेत्रात दुसऱ्या भावाला सरकारी मालमत्तेचा व्यवसाय करता येतो काय?हा प्रश्न अतिशय गंभीरता निर्माण करतो आहे.मात्र पदाचा दुरोपयोग करून खरबो रुपयांचा अवैध मुरुम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालवल्या गेला काय?याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे!
काही का असेना व्यवसायाच्या नावावर चिमूर तालुक्यातील मुरुम गौण खनिज संपदा श्रिकांत मितेश भांगडिया व त्यांच्या २ साथिदारांनी पोखरून टाकली.