श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेला ७ कोटी १५ लाख ढोबळ नफा शंभर कोटी ठेवींचे लक्ष्य पूर्ण: प्रभाकर आरेकर

0
46

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

चिपळूण : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण या
संस्थेला दिनांक ३१ मार्च २०२१ अखेर रू .७ कोटी १५ लाख ढोबळ नफा तर आवश्यक त्या सर्व तरतुदी करून रू .२ कोटी ०८ लाख निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
श्री. प्रभाकर आरेकर यांनी
दिली.मागील आर्थिक वर्षाचे
सुरूवातीपासूनच कोरोनाचे
प्रादुर्भावामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये
निर्माण झालेल्या अनिश्चितीच्या परिस्थितीमध्ये संस्थेने सर्वच स्तरावर उल्लेखनिय कामकाज करून ठेवी व कर्जव्यवहाराचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री
प्रभाकर आरेकर यांनी नमूद केले. दि. ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेच्या एकूण ठेवी रू .१०० ९ १.७ ९ लाख, एकुण कर्जव्यवहार रू .८२०७.६५ लाख, वसूल
भागभांडवल रू .६०७.७४ लाख, निधी रू .४७१.८३ लाख, गुंतवणूक रू .३१७७.०६ लाख झाल्याची माहिती यावेळी बोलताना दिली.आर्थिक वर्षामध्ये
संस्थेच्या ठेवीमध्ये रू .२८ कोटी ७६ लाख तर कर्जव्यवहारामध्ये २७ कोटी ० ९ लाखाने वाढ झाली असून संस्थेचा एकत्रित
व्यवसाय रू .१२६४६.६१ लाख झाला आहे.संस्थेने कोरोनाच्या काळात शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करुन नियोजनबध्द तसेच सुरक्षितता, पारदर्शकता, विश्वासर्हता
व्यावसायिकता यानुसार कामकाज करून ठेवीदारांचा विश्वास संपादन केला असून ठेवीदारांना ठेवीवर आकर्षक व
किफायतशीर व्याजदर
दिल्यामुळे संस्थेच्या ठेवीमध्ये
लक्षणीय वाढ झाली
आहे.त्याचप्रमाणे कर्जवितरण
करताना ठेवीदारांचे आर्थिक
सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य
दिले असून संस्थेच्या
सुरक्षित कर्जाचे प्रमाण ९ २
टक्के आहे.कोरोनाच्या अडचणीच्या काळातही संस्थेच्या सभासद कर्जदारांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करून संस्थेला सहकार्य केल्यामुळे संस्थेच्या थकबाकीचे प्रमाण केवळ १.६८ टक्के असून नेट एनपीओ चे प्रमाण शून्य टक्के राखण्यात संस्था यशस्वी झाली आहे. संस्थेने केलेल्या प्रगतीमध्ये संस्थेचे सभासद, ठेवीदार,कर्जदार, ग्राहक वर्ग व हितचिंतक तसेच सहकारी संचालक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे योगदान असून संस्थेला सहकार्य करणाऱ्या सर्वाचे या वेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी आभार व्यक्त केले.

*दखल न्यूज भारत.*