लावलेल्या निर्बंधांत शिथिलता देऊन छोट्या व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. भाजयुमोची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. बल्लारपूर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

0
67

 

दख़ल न्यूज़ : शंकर महाकाली

बुधवार : आ.सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराज भैया अहिर तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कारण राज्यात कोरोणाचा प्रकोप दिवसेंदिवस प्रचंड वाढतोय. त्यासाठी कडक निर्बंध लावण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कडक निर्बंधारित मिनी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामध्ये जिवनावश्यक वस्तुंचे दुकाने ( भाजीपाला, किराणा, मेडिकल) सोडले तर सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. परंतु हे लाॅकडाऊनसदृश निर्बंध बघता अनेक क्षेत्रांचा अजिबात विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या गोरगरीबांपासुन तर छोट्या छोट्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांच्या जिवाला घोर लागला आहे. अशा परिस्थितीत शासनाने सबंध घटकांचा विचार करून हे निर्बंध शिथिल करावे. ही मागणी घेवुन भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने आज तहसीलदार बल्लारपूर यांची भेट घेतली, व त्यांचेमार्फत मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उक्त मागणिचे निवेदन दिले.

ज्याप्रकारे हे प्रत्यक्षात निर्बंध लादण्यात आलेत, हे पहाता एकप्रकारे अघोषित लॉकडाऊनच आहे. त्यामुळे छोटे दुकानदार, रिटेलर्स, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालये, छोटे कंत्राटदार अशांचा विचार होणे अत्यावश्यक होता. पण तसे झाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्या मोठ्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा मिळेल. आणि गोरगरिबांचे जिवन व अर्थकारण प्रभावित होणार नाही. असे निर्णय व्हावे. आणि जिल्ह्यातील छोट्या मोठ्या व्यावसायिक दुकानदारांना दुकाने उघडण्यासाठी दिलासा देऊन त्यांच्या भरवशावर असणार्‍या सामान्य गोरगरीब मोलमजूरांच्या पोटाला हक्काची भाकर मिळेल अशी तजवीज करावी. अशी मागणी मा. जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात
भाजयुमोने केली आहे.

याप्रसंगी शिष्टमंडळात, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडे, जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाळे, विद्यार्थी आघाडी जिल्हा महामंत्री प्रतिक बारसागडे, पियुष मेश्राम, अभिषेक सतोकार,प्रेम भगत, युगल मेहेंदळे यांसह आदि कार्यकर्ते उपस्थित होते.