गडचिरोली जिल्ह्यातील पुर्ण बाजारपेठ बंद न करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात जिल्हा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांना निवेदन मा.जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांची विनंती शासनाला कळविण्याची दिली हमी

0
149

 

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली:- नुकताच जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद करण्याचा घेतलेला निर्णय निर्णय मागे घेऊन किमान सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत पूर्ण बाजारपेठ सुरू ठेवावी अशी विनंती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदनाद्वारे केली आहे
मा. जिल्हाधिकारी यांचेशी आज आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली व गडचिरोली जिल्ह्यातील लहान -सहान दुकानदार, व्यवसायी,मजूर, कामगार यांची व्यथा मांडली. किमान सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत पूर्ण बाजारपेठ सुरू ठेवावी अशी विनंती विनंती करुन त्याबाबतचे सुधारीत आदेश निर्गमित करावे अशी मागणी केली
यावेळी जिल्हाधिकारी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले व व्यापारी ,व्यवसायी लोकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचवून यावर तातडीने तोडगा काढू असे आश्वासन दिले