शहराला होणारा दुषित पाण्याचा पुरवठा बंद न झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जाणार : भारतीय जनता पक्षाच्या ओबिसी महिला जिल्हाध्यक्ष सौ प्राजक्ता रुमडे

0
157

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : शहरात सोमवार व मंगळवारी पाईप लाईनचं काम असल्याने नळाला पाणी येणार नसल्याचे नगर परिषद ची गाडी दोन दिवस आधी पासून ओरडून सांगत होती. परंतु पाण्याचा साठा करून ठेवण्या इतकं पाणी मुळातच कधी शहरातील वरच्या भागात म्हणजे अभ्युदय नगर, विश्व नगर, चैत्रबन, विष्णु नगर या भागात नळाला येत नाही तर पाण्याचा साठा कसा करणार? त्यात आज बुधवार दिनांक सात रोजी सकाळी आठ वाजता नळाला माती मिश्रीत पाणी जेमतेम अर्धा तास सोडण्याची कृपा नगर परिषदेने केली. ज्या नागरिकांकडे विहीरी नाहीत किंवा त्या आटल्या आहेत ते पूर्णपणे नळाच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यांनी काय करायचे ? आता नगर परिषदेनेच जनतेला सहकार्य करावे. सतत तक्रार करून व निवेदन देण्यात आले तरी फक्त आणि फक्त अश्वासनां व्यतिरिक्त नगर परिषद ने काही केलेले नाही. तरी कृपया जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका यावर उपाय योजना करावी असे रत्नागिरी नगर परिषद ला विनंती. सौ. प्राजक्ता प्रविण रूमडे. भाजपा ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा रत्नागिरी यांनी केली आहे. र. न.प. ला शुध्द पाणी शहराला उपलब्ध करून देता येत नसेल तर पाणी प्रदूषण (नियंत्रण व प्रतिबंध) कायदा 1974 (कलम 2 इ) चे थेट उल्लंघन होत असून संबंधित विषयात बदल होत नसेल तर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

*दखल न्यूज भारत*