विमानतळ-वेतोशी रस्ता दुरुस्त करा आप ची मागणी.

0
55

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : विमानतळा पासून वेतोशी पर्यंतच्या रस्त्याच्या भीषण स्थीतीने उद्विग्न होऊन हे पत्र लिहीत आहे. सबंधीत रस्ता खड्डेमय झाला असून, अनेक स्थानिक रहिवाशी तसेच माझ्यासारखे प्रवासी जे या रस्त्याचा मुंबई महामार्गाला पोहोचण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून वापर करतात, अशांसाठी त्रासदायक झाला आहे. रस्त्याचा काही भाग दुरुस्त करून, डांबरीकरणाने चांगला करण्यात आला आहे. पण ठिगळ लावलेल्या भागाची दुरूस्ती हा मोठा प्रश्न आहे तसेच रस्त्याचा बराचसा भाग पालिकेने पाणी पुरवठा पाईप बसवण्यासाठी खोदला आहे जो अद्याप शिस्तीत दुरूस्त करण्यात आलेला नाही.
विनंती करतो की, वर सांगितलेल्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबधीत रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश जारी करून तातडीने त्यावर अंमलबजावणी व्हावी. अन्यथा, येणार्‍या पावसाळ्यात दुर्दैवी घटना घडु शकतील, जे लक्षात घेता, PWD व जिल्हा परिषदेला त्या रस्त्याची डागडुजी करणे काळाची अत्यावश्यक गरज आहे मी अशी आशा करतो की, माझ्या या पत्राचा खोलवर विचार करून, जे या रस्त्याचा वापर करतात त्यांच्या हीतासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल. अशा आशयाचे पत्र श्री.ज्योतिप्रभा पाटील आम आदमी पक्ष, अंतरिम संयोजक, रत्नागिरी शहर. यांनी अधीक्षक अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग,
रत्नागिरी यांना देण्यात आले आहे.

*दखल न्यूज भारत.*